आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अलीने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दारुचा लोगो असलेला टी-शर्ट घालण्यास नकार दिला. यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने मोइन अलीला जर्सीवरुन दारुचा लोगा हटवण्यास मंजूरी दिली आहे. येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14व्या मोसमाची सुरुवात होणार आहे.
CSK ने यंदाच्या मोसमासाठी आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. टीमच्या स्पॉन्सर्सपैकी एक SNG 10000 चेन्नईमधील दारू बनवणारी कंपनी आहे. मोइनने आपल्या जर्सीवर या कंपनीचा लोगो लावण्यास नकार दिला होता.
CSK ने 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील CSK टीमने 14व्या सीजनसाठी ऑलराउंडर मोइन अलीला 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. मोइन मागच्या सीजनमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम रॉयल चॅलेंर्स बंगळुरूकडून खेळला होता.
इस्लाम धर्मात दारुचे सेवन आणि प्रचार करणे प्रतिबंधित
मोइन इस्लाम धर्माचे पालन करतो. इस्लाम धर्मात दारू पीने, बनवणे आणि प्रचार करणे पाप मानले जाते. हाशिम अमला आणि परवेज रसूलनेही यापूर्वी आपल्या जर्सीवर दारूचा लोगो लावण्यास नकार दिला आहे. हाशिम अमलाने साउथ आफ्रीकेच्या नेशनल टीमच्या जर्सीवर दारुच्या कंपनाचा लोगा लावण्यास नकार दिला होता. तर, 2013 मध्ये IPL मध्ये परवेज रसूलने पुणे वॉरियरकडून खेळताना दारुचा लोगो लावण्यास नकार दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.