आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई सुपरकिंग्ज संघाने आता यंदाच्या सत्रातील आयपीएलचा किताब जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी चेन्नई संघ आता घरच्या मैदानावर कसून सराव करणार आहे. याच सरावातून टीमला आगामी सत्राच्या आयपीएलची तयारी करता येणार आहे. यातून संघाला जेतेपदाचा पल्ला निश्चितपणे गाठता येईल, असा विश्वास कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने व्यक्त केला.
यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या सत्रासाठी खास डावपेच आखल्याचीही माहिती दिली. यासाठी सरावावर अधिक भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी चेपाॅक स्टेडियमवर सराव िशबिराचे आयाेजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे फेब्रुवारी ते मार्चदरम्यान या ठिकाणी शिबिर हाेणार असल्याची चर्चा आहे. चेन्नई संघाचे काही खेळाडू तीन वर्षांनंतर दमदार पुनरागमन करणार आहेत.
धाेनीच्या चेन्नई संघाला गत सत्रातील आयपीएलमध्ये सुमार खेळीचा माेठा फटका बसला. यामुळे चेन्नई संघ दहा संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला हाेता. संघाला १४ सामन्यांमध्ये आठ गुणांची कमाई करता आली. संघाचा जडेजासाेबत वादही झाला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.