आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Chennai Super Kings Vs Mumbai Indians Match 41st Live Cricket Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK vs MI:मुंबई इंडियंसकडून चेन्नईचा 10 गडी राखून पराभव; गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप, सीएसके पहिल्यांदा 8 सामने हरली

शारजाह6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 41वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियंस (MI)दरम्यान शारजाहमध्ये होत आहे. मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने मुंबईला 115 रनांचे टार्गेट दिले. मुंबईने 12.2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 116 रन काढून सामना आपल्या खिशात घातला. मुंबईच्या ईशान किशनने नाबाद 68 आणि क्विंटन डिकॉकने नाबाद 46 रन केले. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

चेन्नईचे 6 फलंदाज 10 धावाही करू शकले नाही. फक्त ऑलराउंटर सॅम करनने सर्वाधिक 52 धावा केल्या. दरम्यान, मुंबईच्या ट्रेंट बोल्टने 4, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरने 2-2 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नई लीगमध्ये 8 सामने हरली. यापूर्वी चेन्नई 2010 आणि 2012 मध्ये 7 सामने हरली होती. या पराभवासह प्ले-ऑफमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. तर, मुंबई सीजनमध्ये 7व्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आली आहे.

करनने चेन्नईला 100 रनांच्या पुढे नेले

चेन्नईच्या सॅम करनने आयपीएलमध्ये आपले दुसरे अर्धशतक लगावले. करन 52 रन काढून इनिंगच्या अखेरच्या बॉलवर आउट झाला. करनच्या खेळीमुळे चेन्नई 114 रनापर्यंत जाऊ शकली. करनशिवाय शार्दूल ठाकुरने 11 आणि इमरान ताहिरने नाबाद 13 रन केले.

3 रनांवर 4 विकेट गमवल्या

चेन्नईची सुरुवात खूप खराब झाली. रितुराज गायकवाड झिरो रनावर ट्रेंट बोल्टच्या बॉलवर आउट झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने अंबाती रायडू (2) आणि एन जगदीशन (0)ला सलग दोन बॉलवर आउट केले. यानंतर फाफ डु प्लेसिस 1 रन काढून बोल्टच्या बॉलवर आउट झाला. यानंतर, रविंद्र जडेजा 7 रनावर ट्रेंट बोल्टच्या बॉलवर आउट झाला. यानंतर कर्णधार एमएस धोनी 16 रन काढून राहुल चाहरच्या बॉलवर पवेलियनमध्ये परतला.

पोलार्डकडे मुंबईचे नेतृत्व

कर्णधार रोहित शर्मा आजच्या सामन्यात नाही, त्यामुळे संघाचे नेतृत्व कीरोन पोलार्डकडे आले आहे. दरम्यान, चेन्नईला प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आपले उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही चेन्नईचे भविष्य ठरेल. दुसरीकडे, शानदार फॉर्ममुळे मुंबईची प्ले-ऑफमध्ये जागा पक्की आहे.

दोन्ही संघ

चेन्नई: सैम करन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, एन जगदीशन, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), रितुराज गायकवाड़, रविंद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दूल ठाकुर, जोश हेजलवुड आणि इमरान ताहिर.

मुंबई: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड (कर्णधार), क्रुणाल पंड्या, नाथन कूल्टर-नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीम बुमराह.

बातम्या आणखी आहेत...