आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chhatrapati Sambhajinagar Parbhani Match Tied; Amit Pawar's Half Century

क्रिकेट:छत्रपती संभाजीनगर-परभणी सामना बरोबरीत; अमित पवारचे अर्धशतक

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १९ वर्षांखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी यजमान छत्रपती संभाजीनगर व परभणी यांच्यातील सामना बरोबरीत राहिला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर संघाला विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या डावात छत्रपती संभाजीनगरने ५५.२ षटकांत सर्वबाद १५७ धावा उभारल्या. परभणीने पहिल्या डावात ४९.१ षटकांत सर्वबाद १५० धावा केल्या. संघ ७ धावांनी पिछाडीवर राहिला. दुसऱ्या डावात मंगळवारी छत्रपती संभाजीनगरने ५०.३ षटकांत ८ बाद १८८ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दिवसअखेर परभणीने १६ षटकांत १ बाद ४२ धावा केल्या.

दुसऱ्या डावात छत्रपती संभाजीनगरच्या राम राठोडने २१, कर्णधार हरिओम काळेने २२ धावा काढल्या. अमित पवारने ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. परभणीच्या मधुश जोशीने ५ गडी बाद केले.