आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारबाजी:सर्वाधिक 33 पदकांसह छत्रपती संभाजीनगर संघाला सर्वसाधारण विजेतेपद

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साई व भारतीय तलवारबाजी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित खेलो इंडिया दस का दम तलवारबाजी स्पर्धा उत्साहात झाली. छत्रपती संभाजीनगर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यात ११ सुवर्ण, १२ रौप्य व १० कांस्यपदकांचा समावेश आहे. लातूरचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत पंच म्हणून पिराजी कुसळे, आकाश बनसोडे, निकिता पाटील, विशाल दानवे यांनी काम पाहिले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : १४ वर्षाखालील मुली फॉइल गट - कनक भोजने (सुवर्णपदक), यशश्री वंजारे (रौप्यपदक), मानसी हुलसूरकर (कांस्यपदक), साक्षी पाटील (कांस्यपदक). इप्पी - जानव्ही जाधव, स्नेहा कश्यप, मानसी वाघ, रोहिणी पाटील. सेबर - हर्षदा झोंड, श्रेया मोइम, स्वराली चव्हाण, भूमिका शिंदे, १७ वर्ष फॉईल गट - अनुष्का अंकमुळे, माही घडवे, स्नेहा वाडकर, आरती सोनावणे. इप्पी - माही अरदवाड, वैभवी माने, अदिती चावले, गायत्री कदम. सेबर - दिव्यंका कदम, अक्षदा भवरे, प्रेरणा जाधव, सोनाली गायकवाड. १९ वर्ष फॉइल गट - वैदेही लोहिया, अदिती अंभोरे, वैष्णवी धंगत, प्राप्ती सोनावणे. इप्पी - गायत्री कदम, स्नेहल पाटील, योगिनी देशमुख, उज्वला जाधव. सेबर - हर्षदा वंजारे, मैत्री तलवांदे, आरती सोनावणे, सैना रानमळ.

बातम्या आणखी आहेत...