आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • China India (Tokyo Olympics); Mirabai Chanu Gold Medal Chance | China Weightlifter Facing Doping Test At Tokyo Olympics

मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक:वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीट होउवर डोपिंगचा संशय, सँपल-A मध्ये संशयानंतर सँपल-B साठी समन्स

टोकयो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेटलिफ्टिंग फेडरेशनने सांगितले - आम्हाला माहित नाही

टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे पदक सुवर्णात रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी अ‍ॅथलीट होउ जिहूईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने होउचे सँपल-B चाचणीसाठी बोलवले आहेत. तिचा सँपल-A क्लिन नाही असे मानले जात आहे.

चिनी अॅथलिट होउ जिहूई आज आपल्या देशात परत येणार होती, परंतु तिला थांबण्यास सांगितले गेले आहे. कोणत्याही वेळी तिची डोपिंग टेस्ट होऊ शकते. ऑलिम्पिकच्या इतिहासात यापूर्वी असे घडले आहे जेव्हा डोपिंग अयशस्वी झाल्यानंतर एखाद्या खेळाडूचे पदक काढून दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला देण्यात आले होते. तर मीराबाई भारतात परतली आहे. दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

वेटलिफ्टिंग फेडरेशनने सांगितले - आम्हाला माहित नाही
वेटलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्ण जिंकणार्‍या चिनी होउ च्या A-सँपलमध्ये शंका आल्यामुळे तिला आता B-सँपलसाठी बोलावण्यात आले आहे. चिनी खेळाडूचा बी-सँपल पॉझिटिव्ह आला, तर IOC आणि टोकियो आयोजन समितीद्वारे याची घोषणा केली जाईल.

मीराने भारताला पहिले पदक मिळवून दिले
मीराने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले आणि एकमेव पदक जिंकवून दिले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. तर चीनच्या होउ जिहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कँटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...