आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chinaman Kuldeep's All rounder; Bangladesh 8 133 In First Innings At The End Of The Day

पहिली कसाेटी:चायनामन कुलदीपची अष्टपैलू खेळी ; बांगलादेश दिवसअखेर पहिल्या डावात 8/ 133

चितगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चायनामन गाेलंदाज कुलदीप यादवने (४० धावा, ४ बळी) अष्टपैलू खेळी करताना भारतीय संघाची गुरुवारी सलामीच्या बांगलादेशविरुद्ध कसाेटीत बाजू मजबूत केली. यासह भारताने आघाडी कायम ठेवली. भारतीय संघाने पहिल्या कसाेटीच्या पहिल्या डावात ४०४ धावा काढल्या. यामध्ये चेतेश्वर पुजारा (९०), श्रेयस अय्यर (८६) आणि आर. अश्विन (५८) यांची अर्धशतकी खेळी लक्षवेधी ठरली. तसेच कुलदीपने ४० धावांचे माेलाचे याेगदान दिले. प्रत्युत्तरामध्ये यजमान बांगलादेश संघाची पहिल्याच डावात घरच्या मैदानावर माेठी दमछाक झाली. संघाला दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी पहिल्या डावात ८ गड्यांच्या माेबदल्यात १३३ धावा काढता आल्या.

अद्याप २७१ धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेश संघाचा मेहंदी हसन मिर्झा (१६) आणि हुसेन (१३) मैदानावर कायम आहेत. भारताकडून पहिल्या डावात माे. सिराजने ३, कुलदीपने ४ आणि उमेश यादवने १ बळी घेतला. यादरम्यान कुलदीप यादवची खेळी उल्लेखनिय ठरली. त्याने अष्टपैलू खेळीतून उल्लेखनीय कामगिरीची नाेेंद केली. त्याने आर. अश्विनसाेबत आठव्या विकेटसाठी ८७ धावांची माेठी भागीदारी रचली. अश्विनने करिअरमध्ये १३ वे कसाेटी अर्धशतक साजरे केले. भारताने कालच्या ६ बाद २७८ धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली हाेती.टीम इंडियाच्या गाेलंदाज कुलदीप यादवने ३.३० च्या इकाॅनाॅमीने १० षटकांत ३३ धावा देताना चार बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...