आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Christiano Ronaldo Tops Chart For Highest Earning Athlete During Lockdown By Amassing 18 Crore, Virat Kohli Earned More Than 3 Crore

लॉकडाउनमध्ये कमाई:18 कोटींची कमाई करुन रोनाल्डो नंबरल वन, तर कोहली 3.6 कोटी कमाईसह सहाव्या स्थानी

स्पोर्ट डेस्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमाईचे हे आकडे 12 मार्च ते 14 मे दरम्यानचे आहेत, टॉप-5 पैकी चार फुटबॉलर

लॉकडाउनदरम्यान जिथे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि कमाई बंद झाली. तिथे, खेळाडूंवर याचा काहीच परिणाम झाला नाही. या लॉकडाउनदरम्यान युवेंटसचा स्टार स्ट्राइकर क्रिस्टियानो रोनाल्डोने इंस्टाग्रामवरुन 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रोनाल्डो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन झालेल्या कमाईच्या बाबतीत एक नंबरला आहे. तर, या यादीत विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर तीन स्पॉन्सर्ड पोस्टमधून एकूण 3.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अटॅन मॅगजीनने 12 मार्च ते 14 मे दरम्यान या खेळाडूंच्या कमाईबाबत एक रिपोर्ट तयार केली. कोहलीला प्रत्येक पोस्टसाठी 1,26,431 पॉन्ड (अंदाजे 1.2 कोटी रुपये) मिळाले. कोहलीचे इंस्टाग्रामवर 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत. तो इंस्टाग्रामवर देशातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे. कोहली टॉप-10 खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय आहे.

रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 22 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर

या यादीत टॉपवर पुर्तगाली फुटबॉलर रोनाल्डोने 18,82,336 पॉन्ड (अंदाजे 17.9 कोटी रुपये) कमवले. रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 22.2 कोटी फॉलोअर आहेत. इंस्टाग्रामवर फॉलो करणाच्या बाबतीत तो जगात नंबर एकवर आहे.

कमाईच्या बाबतीत मेसी दुसऱ्या स्थानी

इंस्टाग्रामवरुन कमाई करण्याच्या बाबतीत रोनाल्डोनंतर बार्सिलोनाचा स्ट्राइकर लियोनल मेसी आहे. मेसीने 4 पोस्टमधून 12,99,373 पॉन्ड (अंदाजे 12.3 कोटी रुपये) कमवले आहेत. तर, तिसऱ्या स्थानावर ब्राजीली स्टार जूनियर नेमार आहे. त्याने 4 पोस्टमधून 11,92,211 पॉन्ड (11.4 कोटी रुपये) कमवले.

टॉप-5 मध्ये बास्केटबॉलचा एकमेव शकील

एनबीए स्टार शकील ओ नील इंस्टाग्रामवरुन झालेल्या कमाईच्या बाबतीत टॉप-5 खेळाडूंमध्ये सामील आहे. शकील चौथ्या स्थानावर आहे. त्याने 16 पोस्टमधून 5,83,628 (अंदाजे 5.5 कोटी रुपये) कमवले आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 1.7 कोटी फॉलोअर्स आहेत. बेकहम या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर आहे. त्याने 4,05,359 पॉन्ड (3.8 कोटी रुपये) कमवले.

फेडडर सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू

मागच्या आठवड्यात फोर्ब्स मॅगजीनने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यात स्विट्जरलँडच्या टेनिस स्टार रोजर फेडररने फुटबॉल स्टार पुर्तगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाच्या लियोनल मेसीला मागे टाकले. फेडरर 106.3 मिलियन डॉलर (अंदाजे 802 कोटी रुपये) कमाईसोबत टॉपवर आहे.

रोनाल्डो दुसऱ्या स्थानावर

भारतीय खेळाडूंपैकी फक्त विराट कोहली टॉप-100 मध्ये सामील आहे. कोहली 26 मिलियन डॉलर (अंदाजे 196 कोटी रुपये) कमाईसोबत 66व्या नंबरवर आहे. लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या रोनाल्डोने मागच्या वर्षी 105 मिलियन डॉलर (793 करोड़ रु.) कमाई केली.

बातम्या आणखी आहेत...