आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षकांनी सांगितले जोकोविचच्या यशाचे रहस्य:पूर्वीपेक्षा अधिक कठोर मेहनत करतो; बिग-3 ने निवृत्तीचे वय वाढवले

बेलग्रेड (सर्बिया)8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाचा खेळ नेहमी वास्तविकतेला धरून असतो. पूर्वी टेनिसपटू ३० वर्षांचे झाल्यानंतर निवृत्तीचा विचार करत होते. आता मात्र तसे राहिले नाही. माजी नंबर-१ व सध्याचा जगातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू नोवाक जोकोविच, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा राफेल नदाल व रॉजर फेडररने हा पायंडा बदलला आहे. त्याचप्रमाणे ३६ वर्षीय राफेल नदाल व ३५ वर्षीय नोवाक जोकोविच अजूनही टेनिस कोर्टवर दिसत आहेत. अलीकडेच सर्बियाच्या जोकोविचने सहाव्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले. चॅम्पियन बनल्यानंतर जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेविक यांनी त्याच्या यशाचे आणि तंदुरुस्त राहण्याचे रहस्य उघड केले.

ते म्हणाले की, ‘जोकोविच २२ वर्षांचा असताना जसा सराव करत होता, आता वयाच्या ३५ वर्षांनंतर तो पूर्वीपेक्षा जास्त सराव करत आहे. त्यामुळेच तो अजूनही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो आणि अधिक चांगलीही.’

मी आपली बॅग भरली होती अन् वाट पाहत होतो कोरोना लस न घेतल्याने जोकोविचला यूएस ओपनमध्ये खेळता आले नाही. त्यावर प्रशिक्षक गाेरानने म्हटले की, ‘जाेकाेविचने विम्बल्डन जिंकल्यानंतर काही दिवस आराम केला. मात्र ताे तयारीला लागला. कारण आम्हाला अमेरिकेतून चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा हाेती. मी आपली बॅग भरली हाेती, अन् वाट पाहत हाेताे. आणखी एक आठवडा गेला, त्यानंतर यूएस आेपन सुरू झाले, तेव्हा कळले आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश नाही.’

बातम्या आणखी आहेत...