आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी नेटवर्क:कोको गॉफने खेळला 50 वा सामना, सलग सेटमध्ये बुकासाला हरवले

इंडियन वेल्स14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची टेनिसपटू कोको गॉफने इंडियन वेल्सची पुढील फेरी गाठली आहे. सहाव्या मानांकित गॉफने स्पेनच्या क्रिस्टिना बुकासाचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा १८ वर्षीय गॉफचा ५० वा डब्ल्यूटीए १००० स्तरावरील सामना होता. २००९ मध्ये प्रीमियर फॉरमॅट आल्यानंतर अशी कामगिरी करणारी ती दुसरी युवा खेळाडू ठरली. अनास्तासिया पावल्युचेन्कोव्हा २० वर्षांची होण्यापूर्वी ५३ वा डब्ल्यूटीए १००० स्तरावरील सामने खेळली होती. गॉफची आता झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोवाशी लढत होईल. दरम्यान, द्वितीय मानांकित आर्याना सबालेंका, तृतीय मानांकित जेसिका पेगुला व मारिया सक्कारीने पुढील फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पुरुष एकेरीत दुसरा मानांकित स्टिफानोस सितसिपासचा धक्कादायक पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉपसनने सितसिपासला ७-६, ४-६, ७-६ ने हरवले.

बातम्या आणखी आहेत...