आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Comeback On The Field In Excitement With A Sense Of Responsibility; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:जबाबदारीचे भान ठेवून उत्साहात मैदानावर कमबॅक; शहरातील क्रीडा मैदाने अनलॉक, सरावासाठी खेळाडू आजपासून परतणार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रकाेप काहीसा कमी झाला. मात्र, धाेका वाढणार नाही याच जबाबदारीचे भान ठेवून अाम्ही मैदानावर पुनरागमन करणार अाहाेत. दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर कमबॅक करण्याचा प्रचंड उत्साह अाहे. मात्र, त्याचबराेबर ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचेही भान अाम्हाला अाहे. त्यामुळे प्राेटाेकाॅलचे पालन करून अाम्ही मैदानावर सरावाला सुरुवात करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया अाैरंगाबादमधील क्रीडा संघटक, प्रशिक्षक अाणि खेळाडूंनी दिली.

राज्य सरकारच्या परवानगीने अाैरंगाबाद अाता अनलाॅक करण्यात अाले. या निर्णयाने खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह अाणि अानंदाचे वातावरण अाहे. यातून अाज साेमवारपासून शहरातील क्रीडा मैदाने अाता खेळाडूंमुळे गजबजून जाणार अाहे.

धाेका कायमची जाणीव ठेवून सराव
खेळाडू अनलॉक झाल्याने उत्साहात मैदानावर खेळणार आहेत. मात्र, हे करताना धाेका कायम असल्याची जाणीव सर्वांमध्ये अाहे. हेच लक्षात ठेवून सर्वजण मैदानावर खेळताना दिसतील. खेळाडूच्या तोंडावर मुखपट्टी नक्कीच असेल. आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष खेळ चालू आहे अशा काही विशिष्ट जागा सोडल्या तर बाकी ठिकाणी मुखपट्टी लावण्याकरता आग्रह संबंधित काेच करतील. पुन्हा तिसरी लाट येऊ नये याकरता आपणच खबरदारी घेणे गरजेचे आहे. गाेविंद शर्मा, सरचिटणीस, खाे-खाे संघटना

माझी काेचिंग, माझी जबाबदारी
मैदानावर खेळाडूंना मार्गदर्शन करताना काेचच्या भूमिकेत असताना सुरक्षेची माझी जबाबदारी अाहे. त्यामुळे मी सर्व नियमांचे पालन करणार अाहे. तसेच खेळाडूंनाही याचे पालन करण्यासाठी सांगणार अाहे. यातून धाेका टाळण्यास मदत हाेईल. -विनाेद माने, प्रशिक्षक, क्रिकेट

नियम पाळून खेळाडू मैदानावर उतरणार
शहर अनलॉक झाल्याने अतिशय आनंद होत आहे. पूर्ववत सुरू होत असल्याने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळाडू सराव करणार अाहेत. मात्र, हे करताना अाम्ही काेेराेनाला राेखण्यासाठी नियमांचे पालन करणार अाहाेत. यादरम्यान धाेका निर्माण हाेणार नाही याबाबत खबरदारी घेणार अाहाेत. महामारी अद्यापही पूर्णपणे नाहीशी न झाल्यामुळे सर्व खेळाडू व पालकांना व्हॅक्सिन घेण्यास प्रवृत्त करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. गणेश कड, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक

वैद्यकीय सल्ला घेऊन पुनरागमन
सध्याची परिस्थिती अधिक गंभीर अाहे. काेराेना झालेल्या खेळाडूंनी अाता वैद्यकीय सल्ला घेऊनच मैदानावर परतण्याचा निर्णय घ्यावा, याने भविष्यातील धाेका टाळता येऊ शकेल. काेेराेना संपला नाही. खबरदारीतून अाम्ही सायकलिंग करणार अाहाेेत. डॉ विजय व्यवहारे, अध्यक्ष, सायकलिस्ट फाउंडेशन

धोका संपलेला नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे
खेळाडूंना सरावाची संधी मिळावी, आरोग्य सदृढ राहावे, रोगप्रतिकारकशक्ती वाढावी यासाठी मैदाने खुली करण्यात आली आहेत. यासाठी खेळाडूंनी सरावाला येताना वेळेचे काटेकोर पालन करावे. गरज नसताना सरावानंतर मैदानावर थांबू नये. खेळाडूंमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचप्रमाणे पालकांनीही अनावश्यक मैदानावर गर्दी करू नये. ज्या खेळाडूला थोडा जरी त्रास होत असल्यास अशा खेळाडूंनी स्वतःहून सरावाला जाण्यासाठी टाळावे. सतर्क राहणे व कायमस्वरूपी पालन करणे अपेक्षित आहे. डॉ. उदय डोंगरे, सरचिटणीस, महाराष्ट्र तलवारबाजी संघटना

बातम्या आणखी आहेत...