आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Commonwealth Games 2022 Day 1: India Vs Australia In T20 Cricket, India Vs Pakistan In Badminton

कॉमनवेल्थ गेम्स:बॉक्सर शिव थापाकडून पाकिस्तानच्या सुलेमानचा पराभव, भारताच्या पुरुष आणि महिला संघाचीही टेबल टेनिसमध्ये शानदार सुरुवात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

22 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक इंग्लंडला मिळाले. ऑलिम्पिक चॅम्पियन अॅलेक्स यीने ट्रायथलॉनमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, पहिल्या दिवशी भारताची सुरुवातही चांगली झाली होती. टेबल टेनिस पुरुषांच्या स्पर्धेत भारतीय संघाने बारबाडोसचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, भारतीय बॉक्सर शिव थापाने 65 किलो वजनी गटात पाकिस्तानी बॉक्सर सुलेमान बलोचचा 5-0 असा पराभव करून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले.

याशिवाय जलतरणपटू श्रीहरी नटराज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. टेबल टेनिस महिला सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी लॉन बॉल, टेबल टेनिस, जलतरण, ट्रायथलॉन, महिला क्रिकेट आणि सायकलिंगमध्ये भाग घेतला आहे. बॅडमिंटन, नेट बॉल, स्क्वॉश आणि हॉकीचे सामने अजून व्हायचे आहेत.

मुख्य शरथ कमल आणि साथियान एकतर्फी विजयी भारतीय महिला टेबल टेनिस संघानंतर आता पुरुष संघानेही विजयाने मोहिमेला सुरुवात केली आहे. भारतीय संघाने बारबाडोसचा 3-0 असा पराभव केला.

विजय साजरा करताना भारतीय टेबल टेनिस खेळाडू.
विजय साजरा करताना भारतीय टेबल टेनिस खेळाडू.

पहिला सामना (दुहेरी): हरमीत देसाई आणि जी. साथियानच्या जोडीने केव्हिन फार्ले आणि टायरेस किंग्सचा 11-9, 11-9, 11-4 असा पराभव करत संघाला 1-0 ने आघाडीवर नेले.
दुसरा सामना (एकेरी): अचंता शरथ कमलने रॅमन मॅक्सवेलचा 11-5, 11-3, 11-3 असा सरळ पराभव केला. यानंतर भारताची आघाडी 2-0 अशी झाली.
तिसरा सामना (एकेरी): जी. साथियानने टायरेस किंग्सचा 11-4, 11-4, 11-5 असा पराभव केला. या विजयासह भारताने हा सामना 3-0 असा जिंकला.

मनिका आणि श्रीजा यांनी टेबल टेनिसमध्ये विजय मिळवला
टेबल टेनिस महिला गट 2 च्या पात्रता फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला. भारताने एक दुहेरी आणि दोन एकेरी सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धा सर्वोत्कृष्ट पाचच्या आधारे खेळल्या जातात. तीन सामने जिंकणारा संघ हा मुख्य सामना जिंकतो.

पहिला सामना (दुहेरी) : श्रीजा अकुला आणि रीट टेनिसन या पहिल्या भारतीय जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड-दानीशा पटेल जोडीचा दुहेरीच्या सामन्यात 1-7, 11-7, 11-5 असा पराभव केला. या विजयामुळे भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली.
दुसरा सामना (एकेरी): स्टार पॅडलर मनिका बत्राने एकेरीत मुशफिकुह कलामचा 11-5, 11-3, 11-2 असा पराभव केला. मनिकाने भारताची आघाडी दुप्पट केली.
तिसरा सामना (एकेरी): श्रीजा अकुलाने दानिश जयवंत पटेलचा 11-5, 11-3, 11-6 असा पराभव केला. या विजयासह भारताने 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आणि सामना जिंकला.

कुशाग्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही
दिल्लीचा जलतरणपटू कुशाग्र रावत पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र ठरू शकला नाही. 8-प्लेअर हीटमध्ये तो शेवटच्या स्थानावर राहिला. नटराज पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्टोक हीट-3 मध्ये सहभागी होईल.

लॉन बॉलमध्ये तानिया चौधरीचा पराभव
दुसरीकडे भारताच्या तानिया चौधरीला लॉन बॉलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला स्कॉटलंडच्या डी हाँगने 21-10 असे पराभूत केले. त्याचवेळी, फेरी-1 च्या सांघिक सामन्यात भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून 23-21 असा पराभव झाला. पुरुष गटातील भारतीय संघाचा सामना तीन तासांनंतर होणार आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्या दिवशी शुक्रवारी सामने सुरू होतील. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या वर्षातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स मल्टी इव्हेंटच्या पहिल्या दिवशी 16 सुवर्णपदके पणाला लागली आहेत. या 7 सुवर्णांपैकी सर्वाधिक सुवर्णपदक हे स्विमिंगमधीली आहेत. खेळाडू ट्रॅक सायकलिंगमध्ये 6 सुवर्ण, ट्रायथलॉनमध्ये 2 आणि कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये 1 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा असणार आहे.

याशिवाय बॅडमिंटन, बॉक्सिंग, महिला क्रिकेट, हॉकी, लॉन बॉल, टेबल टेनिस, नेटबॉल, स्क्वॉश या खेळांचे लीग सामने खेळवले जाणार आहेत.

तब्बल 11 दिवस चालणाऱ्या या खेळांमध्ये 72 देशांतील 5 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत असून, यामध्ये 20 खेळांमध्ये 280 स्पर्धा होणार आहेत. भारताचा 213 सदस्यीय संघ सहभागी होणार आहे. यात 110 पुरुष आणि 103 महिला खेळाडू आहेत.

भारतीय महिला हॉकी संघ घानाविरुद्ध खेळणार
महिला हॉकीच्या गट ए सामन्यात भारतीय संघ घानाशी भिडणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर असलेला भारतीय संघ या सामन्यात मोठ्या फरकाने विजयाचा दावेदार असेल. भारताच्या गटात इंग्लंड, कॅनडा आणि वेल्सचे संघही आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड आणि केनिया या संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

भारताचा सामना पाकिस्तानशी
बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत भारत आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध खेळत करणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने होणार आहेत. या पाच सामन्यांमध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या प्रत्येकी एका सामन्याचा समावेश आहे. बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका अ गटात आहेत. या गटात अव्वल स्थान पटकावत भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय महिला संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान
1998 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर प्रथमच क्रिकेट या मेगा इव्हेंटमध्ये परतत आहे. यावेळी महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...