आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Commonwealth Games | A Historic Medal Won By Suvarna, Lovely, Pinky, Nayanmani, Rupa In Lawn Ball Debut.

राष्ट्रकुल स्पर्धा:लाॅन बाॅलच्या पदार्पणातच सुवर्ण, लवली, पिंकी, नयनमणी, रूपाने जिंकले एेतिहासिक पदक

बर्मिंगंहॅम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवली चाैबे, पिंकी, नयनमणी आ‍णि रूपा राणी तिर्कीने सर्वाेत्तम कामगिरीतून भारतीय संघाला राष्ट्रकुल स्पर्धेत एेतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. या चाैघींच्या सर्वाेत्तम कामगिरीतून भारताने लाॅन बाॅल खेळात पदार्पणातच राष्ट्रकुल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. भारतीय महिला संघाने फायनलमध्ये मंगळवारी द आ‍फ्रिकेवर मात केली. भारताने १७-१० ने सामना जिंकला. भारतीय टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले. टीमने फायनलमध्ये सिंगापूरचा पराभव केला. त्यामुळे भारताला सुवर्णपदकाची नोंद आ‍पल्या नावे करता आ‍ली. आ‍ता भारताच्या नावे एकूण १२ पदकांची नोंद झाली. यात पाच सुवर्ण, ४ राैप्य व ३ कांस्यपदकाचा समावेश आ‍हे.

भारतामध्ये लाॅन बाॅलची सुरुवात २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतून झाली. लाॅन बाॅल हा एक प्रकाराचा बाॅलिंग गेम आ‍हे. १९६६ वगळता प्रत्येक वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत या खेळाचा समावेश आ‍हे. हा खेळ एकेरी वा सांघिकमध्ये खेळला जाताे. एकेरीत दाेन खेळाडू समाेरासमाेर असतात. सांघिक गटाच्या फाॅरमॅटमध्ये २, ३ वा ४ खेळाडूंचा टीममध्ये समावेश असताे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला जॅक बाॅल राेल करण्याची संधी मिळते. हा थ्राे बाॅलपेक्षा लहान असताे. जॅक बाॅलला प्लेइंग एरियामध्ये एकाकडून दुसऱ्या टाेकाकडे राेल केले जाते. खेळाडू एक-एक करून थाे बाॅल राेल करतात. थ्राे बाॅलला जॅक बाॅलपर्यंत टार्गेट असते. जितक्या जवळचे अंतर गाठले, तितके अधिक गुण मिळतात. एकेरीत २५ गुणांचा पहिला सेट असताे.

वेटलिफ्टिंगमध्ये आ‍ठवे पदक: हरजिंदरला कांस्य, विकासला राैप्य; पूनम यादवची निराशा
भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग खेळ प्रकारातील पदकाची लय कायम ठेवली. वेटलिफ्टर हरजिंदर काैरने साेमवारी मध्यरात्री कांस्यपदक पटकावले. तिने महिलांच्या ७१ किलाे वजन गटात हे यश संपादन केले. तसेच विकास ठाकूरने पुरुषांच्या ९० किलाे वजन गटात राैप्यपदक पटकावले. यासह भारताच्या नावे वेटलिफ्टिंमध्ये आ‍ठव्या पदकाची नोंद झाली. हरजिंदरने आ‍पल्या गटात एकूण २१२ किलाे वजन पेलल्याचा पराक्रम गाजवला. यात स्नॅचच्या ८३ आ‍णि क्लीन-जर्कच्या ११९ किलाे वजनचा समावेश आ‍हे. महिलांच्या ९२ किलाे वजन गटात पूनम यादव अपयशी ठरली.

हरमीतच्या सर्वाेत्तम खेळीने सुवर्णपदक
आ‍ंतरराष्ट्रीय खेळाडू हरमीत देसाईने सर्वाेत्तम खेळीतून मंगळवारी भारतीय संघाला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये सिंगापूरचा ३-१ ने पराभव करत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.

लांब उडी : श्रीशंकर, अनिस अंतिम फेरीमध्ये
भारताच्या लाँग जम्पर मुरली श्रीशंकर आ‍णि माे. अनिसने आ‍पल्या गटाची फायनल गाठली. राष्ट्रीय विक्रमवीर श्रीशंकरने पात्रता फेरीत ८.०५ मीटरची उडी मारली. ताे ८ मीटरपेक्षा अधिक उडी घेणारा एकमेव जम्पर ठरला. अनिसने ७.६८ मीटरची उडी घेत पात्रता मिळवली. त्यामुळे आ‍ता यांच्याकडून संघाला पदकाची आ‍शा आ‍हे.

जलतरण : अद्वैत व कुशाग्र अंतिम फेरीत
भारताच्या जलतरणपटू अद्वैत पागे आ‍णि कुशाग्र रावतने १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात पदकाच्या आ‍शा पल्लवित केल्या. या दाेघांनी सर्वाेत्तम वेळ नोंदवत या इव्हेंटची फायनल गाठली. अद्वैतने पहिल्या हिटमध्ये १५ मिनिट ३६.३५ सेकंदांत निश्चित अंतर गाठले. तसेच कुशाग्रने दुसऱ्या हिटमध्ये १५ मिनिटे ४७.७७ सेकंदांची वेळ नोंदवली. हे दाेघेही आ‍पापल्या हिटमध्ये चाैथ्या स्थानी राहिले. श्रीहरी नटराज हा २०० मीटर बॅकस्ट्राेकची फायनल गाठू शकला नाही. त्यामुळे त्याचे पदकाचे स्वप्न भंगले.

हाॅकी : कॅनडाविरुद्ध विजयाने भारताला उपांत्य फेरीची संधी
मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हाॅकी संघ आ‍ता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी उत्सुक आ‍हे. संघाला याची माेठी संधी आ‍हे. भारत आ‍णि कॅनडा यांच्यात आ‍ज बुधवारी सामना हाेणार आ‍हे. यातील विजयाने भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेशाचा दावा मजबूत हाेणार आ‍हे. भारताने सलामी सामन्यात घानाविरुद्ध ११-० ने शानदार विजय संपादन केला. मात्र, इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात भारताला ४-४ ने बराेबरीत राेखले. मात्र, आ‍ता पुरुष संघ कॅनडाविरुद्ध सामन्यातून पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक आ‍हे. या सामन्यात भारताचा विजयाचा दावा मजबुत आ‍हे. दुसरीकडे भारतीय महिला संघाला मंगळवारी इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड संघाने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...