आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Commonwealth Games | Bronze To Gurudeep Singh; India's First Ever Medal In Heavyweight

राष्ट्रकुल स्पर्धा:गुरुदीप सिंगला कांस्य; भारताला हेवीवेटमध्ये पहिल्यांदाच पदक

बर्मिंगहॅम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा सात वेळचा नॅशनल चॅम्पियन वेटलिफ्टर गुरुदीपसिंग गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने पुरुषांच्या १०९+ वजन गटात कांस्यपदकाची कमाई केली. यासह भारताच्या नावे पहिल्यांदाच हेवीवेट गटात पदकाची नाेंद झाली आहे. यासह भारताचे आता राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारामध्ये सर्वाधिक १० पदकांची कमाई केली आहे. ही आतापर्यंतची या खेळ प्रकारातील भारताची सर्वाेत्तम कामगिरी ठरली आहे. शेतकरीपुत्र असलेल्या २६ वर्षीय गुरुदीपने एकूण ३९० किलाे वजन पेलले आहे. यामध्ये स्नॅचच्या १६७ किलाे आणि क्लीन-जर्कमधील २२३ किलाे वजनचा समावेश आहे. त्याने क्लीन-जर्कमध्ये सर्वाेत्तम कामगिरीतून आपलाच राष्ट्रीय विक्रम ब्रेक केला.

अॅथलेटिक्स : तेजस्विनला कांस्य : राष्ट्रीय विक्रमवीर हाय जम्पर तेजस्विन शंकरने भारतासाठी अॅथलेटिक्समध्ये पदकाचे खाते उघडले. त्याने उंच उडीमध्ये कांस्यपदक पटकावले. त्याने २.२२ मीटर उडी घेत पदकाचा बहुमान पटकावला.

हाॅकी : भारत उपांत्य फेरीत :
भारतीय संघाने आपली विजयी माेहिम कायम ठेवताना उपांत्य फेरी गाठली. संघाने गुरुवारी वेल्सचा पराभव केला. भारताने ४-१ ने सामना जिंकला. हरमनप्रीतने तीन गाेल केले.

स्क्वॉश : साैरव घाेषालचे दुसरे पदक; गतचॅम्पियनवर मात बॉक्सिंग : अमित पंघालसह जास्मिनची उपांत्य फेरीत धडक भारताच्या साैरव घाेषालने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्याने स्क्वॉशमध्ये दुसरे पदक जिंकले. यासह ताे राष्ट्रकुल स्पर्धेत दाेन पदके जिंकणारा भारताचा पहिला स्क्वॅशपटू ठरला. जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या साैरवने लढतीत गत चॅम्पियन जेम्सचा पराभव केला. त्याने ११-६, ११-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह ताे कांस्यपदकाचा मानकरी ठरला. हे त्याचे दुसरे पदक ठरले. यापूर्वी त्याने गत स्पर्धेत दीपिका पल्लीकलसाेबत मिश्र दुहेरीत राैप्यपदक पटकावले हाेते.

आंतरराष्ट्रीय बाॅक्सर अमित पंघाल आणि जास्मिनने भारतीय संघाकडून बाॅक्सिंगमधील पदके निश्चित केेली. या दाेघांनी आपापल्या वजन गटाचे उपांत्यपूर्व फेरीच्या फाइट जिंकून उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. अमितने फ्लायवेट गटाच्या अंतिम आठमध्ये स्काॅटलंडच्या लेनन मुलिगनचा पराभव केला. यासह ताे उपांत्य फेरीत दाखल झाला. तसेच जास्मिनने ६० किलाे वजन गटात न्यूझीलंडच्या ट्राॅय गार्टनला धूळ चारली. तिने ४-१ ने सामना जिंकला. यासह तिने अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला.

बातम्या आणखी आहेत...