आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताला कुस्तीत सहा पदके मिळाली. रवी दहिया, विनेश फोगट आणि नवीन कुमार यांनी सुवर्ण जिंकले. तर पूजा गेहलोत, पूजा सिहाग आणि दीपक नेहरा यांनी कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे या खेळात भारताच्या खात्यात 12 पदके मिळाली आहेत. शुक्रवारी दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक जिंकले. तर अंशू मलिकने रौप्य आपल्या नावावर केले. दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल यांच्या खात्यात कांस्यपदक आले.
शनिवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात 13 सुवर्णांसह 40 पदके आहेत. जाणून घ्या, भारतासाठी शनिवार कसा होता...
नवीन, विनेश आणि रवी यांनी सुवर्णपदक जिंकले
नवीन कुमारने कुस्तीमध्ये भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला. नवीनच्या आधी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. विनेशचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले. 2014 आणि 2018 मध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते.
विनेशच्या श्रेणीत नॉर्डिक पद्धतीने सामने झाले. यामध्ये एका कुस्तीपटूला त्याच्या वजन गटात उपस्थित असलेल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळावे लागते आणि नंबर-1 पहिलवानाला सुवर्णपदक मिळते. विनेशने तिचे आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. शेवटचा सामना श्रीलंकेच्या चामुंडया केसानीशी झाला होता. यामध्ये तिने 4-0 असा विजय मिळवला. जेव्हा वजन श्रेणीमध्ये 6 कुस्तीपटू नसतात तेव्हा नॉर्डिक प्रणाली लागू केली जाते.
कुस्तीपटू रवी दहियाने 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नायजेरियन कुस्तीपटू ई वेल्सनचा 10-0 असा पराभव केला. याआधी रवीने पाकिस्तानच्या असद अलीला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानी हा सामना 14-4 असा जिंकला. रवीने न्यूझीलंडचा कुस्तीपटू सूरजचा 1 मिनिट 14 सेकंदात 10-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला होता.
कुस्तीमध्ये भारतासाठी तीन कांस्यपदके
शनिवारी पूजा गेहलोतने 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफॅकचा 12-2 असा पराभव केला. पूजा सिहागनेही कुस्तीत कांस्यपदक पटकावले. तिने 76 किलो फ्रीस्टाइलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुइनचा 11-0 असा पराभव केला. दीपक नेहराने कुस्तीत भारताला 12वे पदक मिळवून दिले. त्याने 97 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या तयेब राजाला 10-2 असे पराभूत करून कांस्यपदक जिंकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.