आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Commonwealth Games Kicks Off In Metha Jallesh, With UN Ambassador On The Field As A Player

काॅमनवेल्थ गेम्स:संयुक्त राष्ट्राची अ‍ॅम्बेसेडरही खेळाडूच्या भूमिकेत मैदानावर, काॅमनवेल्थ गेम्सना माेठ्या जल्लाेषात सुरुवात

बर्मिंगहॅम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे २२ व्या काॅमनवेल्थ गेम्सला गुरुवारी माेठ्या जल्लाेषात सुरुवात झाली. यादरम्यान ७२ देशांतील ५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात आपापल्या व्यवसायात वेगळी भूमिका बजावत काहींनी खेळातील आपला छंदही अविरतपणे जाेपासला. त्यामुळे त्यांना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करता आला. यामध्ये हेअर ड्रेसर जेव्हियर साेटाेमेयरसह संयुक्त राष्ट्राच्या अ‍ॅम्बेसेडरही आता खेळाडूच्या भूमिकेत काॅमनवेल्थ गेम्सच्या मैदानावर उतरले आहेत. यामध्ये वेल्सच्या १६ वर्षीय एना हर्सीचा सहभाग लक्षवेधी ठरत आहे. ती महिलांच्या टेबल टेनिस प्रकारात आपल्या वेल्स देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिने संयुक्त राष्ट्राची अ‍ॅम्बेसेडर म्हणूनही काम केले आहे. फाॅकलँड आयलँडचा जेव्हियर साेटाेमेयर स्पर्धेत सहभागी झाला.

बातम्या आणखी आहेत...