आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:स्पर्धा होणे खूप गरजेचे, त्यातूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळते : अपूर्वी

जयपूर ( संजीव गर्ग )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्ल्ड चॅम्पियन अपूर्वीने मिळवला अाॅलिम्पिकचा काेटा
  • लॉकडाऊनदरम्यान फोटोग्राफी शिकली

१० मीटर एअर रायफलची जागतिक विजेता नेमबाज अपूर्वी चंदेलाच्या मते, स्पर्धा होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. सध्या मैत्रीपूर्ण सामनेदेखील महत्त्वाचे ठरतील. अपूर्वी जगातील नंबर वन रायफल शूटर राहिली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवून दिलेल्या अपूर्वीने विश्वचषकात तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. २७ वर्षीय अपूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्येदेखील चॅम्पियन आहे. लॉकडाऊनदरम्यान घरचे काम करत स्वत:ला तंदुरुस्त ठेवले. कोविड-१९, लॉकडाऊन आणि टोकियो ऑलिम्पिक बाबतीत तिच्यासाेबतच्या चर्चेतील सारांश...

सरावाच्या अभावाचा कामगिरीवर काही परिणाम होईल का?

अनेक नेमबाज आपापल्या केंद्रात सरावासाठी जात आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, आम्हाला सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर आदींवर लक्ष्य द्यावे लागेल. तसेच सराव करू शकत नसल्याची बाब आहे. सामने व स्पर्धा गरजेचे आहे.

नेमबाज स्वत:ला मोठ्या स्पर्धेसाठी कसे तयार करू शकतील ?

नेमबाजी असा खेळ आहे, ज्यात तुम्ही एकमेकांपासून अंतर ठेवतात. हा सांघिक खेळ नाही. तसे सर्व नेमबाजी संघटना, प्रशिक्षक, खेळाडू, पालकांना नियमावली देण्यात आली आहे.

कोटा मिळवला.आयोजनावर संशय असून किती कठीण काळ?

हा काळ सर्व खेळातील खेळाडूंसाठी कठीण आहे. अशात सकारात्मक राहणे खूप गरजेचे आहे. आपल्याला परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. सोबत खेळाडूंनी सराव कायम ठेवावा आणि फिटनेसवरदेखील लक्ष्य द्यावे. मला २०२१ मध्ये ऑलिम्पिक होण्याची आशा आहे. कोटा मिळवणारे खेळाडू युवा आहेत.

स्टेडियम व क्रीडा संकुले उघडली आहेत. मात्र, खेळाडू येत नाहीत ?

कमी खेळाडू स्टेडियममध्ये जाताय. कारण सर्वाधिक खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. अनेक राज्ये व जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अद्याप येण्या-जाण्याची सुविधादेखील नाही. त्यामुळे खेळाडूंचे स्टेडियममध्ये जाणे कठीण आहे.

लॉकडाऊनदरम्यान काय केले?

लॉकडाऊनदरम्यान मी कुटुंब व प्राण्यासोबत वेळ घालवला. आमच्या घरात जे व्यक्ती काम करतात त्यांना त्यांच्या गावी पाठवले. कारण, ते त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकतील. माझा दिवस सकाळी ५.३० वाजता सुरू होत होता. घरातील साफसफाई करते. तोे एक प्रकारे माझा व्यायामाचा भाग बनला. मी फोटोग्राफी शिकणे सुरू केले. यात गगनभय्या (गगन नारंग) आणि काका हेम सिंग खंगारोत यांनी मदत केली. दोघांची कॅमेऱ्यावर चांगली पकड आहे. मला निसर्ग आणि प्राण्याची फोटोग्राफी आवडते. मी दररोज सराव कायम ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...