आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपा अमेरिका:मॅराडोना जिंकू शकले नाही तो कप मेसीने जिंकला, अर्जेंटिनाची ब्राझीलवर 1-0 ने मात; मारियाचा गाेल

रियाे दि जानेरिओएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुखापतीनंतरही मेसी फायनलमध्ये खेळला

सुपरस्टार लियाेनेल मेसीचा अर्जेंटिना फुटबॉल संघ लॅटिन अमेरिकनमध्ये वरचढ ठरला. दुखापतीनंतरही फायनलमध्ये सहभागी हाेऊन मेसीने आपल्या अर्जेंटिना संघाला प्रतिष्ठेचा काेपा अमेरिका किताब मिळवून दिला. अर्जेंटिना संघाने अंतिम सामन्यात नेमारच्या ब्राझीलला १-० ने पराभूत केेले. मारियाने (२२) एकमेव गाेल केला. यातून अर्जेंटिनाला १५ व्यांदा काेपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवता आला. यासह अर्जेंटिनाने सर्वाधिक विजेतेपदामध्ये उरुग्वे टीमच्या कामगिरीशी बराेबरी साधली.

मेसीचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद; दुखापतीकडे दुर्लक्ष :
फुटबाॅलच्या विश्वातील सुपरस्टार लियाेनेल मेसीने पहिल्यांदाच आपल्या राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय किताब जिंंकले आहेत. अर्जेंटिना संघाकडून मेसीने पहिल्यांदा काेपा अमेरिका स्पर्धेची ट्राॅफी उंचावली. हा बहुमान मिळवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. यासाठी त्याने गंभीर दुखापतीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याला माेठे यश संपादन करता आले. त्याला काेलंबियाविरुद्ध दुखापत झाली हाेती.

मेसीचा सहभाग प्रेरणादायी : स्काेलनी
ब्राझीलविरुद्ध फायनलपूर्वीच आमच्या संघाचा मेसी हा जायबंदी हाेता. त्याच्याशिवाय मैदानावर उतरणे हे आमच्या संघातील खेळाडूंसाठी आव्हानात्मक हाेते. कारण, त्याच्या सहभागातून प्रत्येकाला वेगळी ऊर्जा मिळते. याच प्रेरणादायी खेळीतूनच मारियाने संघाचा विजय साकारला. त्याचे यासाठीचे याेगदान महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत अर्जेंटिना संघाचे मुख्य प्रशिक्षक स्काेलनी यांनी मेसीवर काैतुकाचा वर्षाव केला.

मोठ्या सामन्यातील देवदूत
फायनलमध्ये एकमेव गोल एंजेल डी मारियाने केला. त्याने ३ वर्षांनंतर या सामन्यात गोल केला आहे. दिग्गज खेळाडूंनी म्हटले- एंजेलच मोठ्या सामन्यातील देवदूत बनला.

१० जुलैचा योगायोग
पोर्तुगालने रोनाल्डोच्या नेतृत्वात २०१६ मध्ये १० जुलै रोजीच युरो कप जिंकला होता. त्यानंतर ठीक ५ वर्षांनी याच दिवशी मेसीच्या नेतृत्वात अर्जेंटिना ‘कोपा अमेरिका’चा चॅम्पियन बनला.

मेसीला सर्वात मोठा पुरस्कार
मेसीला खंत होती की, तो कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकू शकला नाही. ‘स्टारडम’मध्ये आपल्या बरोबरीचा असलेला खेळाडू रोनाल्डोनेही पोर्तुगालला युरो कप जिंकून दिला होता.

बातम्या आणखी आहेत...