आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Corona Effect | This Year's National Sports Awards Ceremony Is In Trouble

कोरोना इफेक्ट:यंदाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा अडचणीमध्ये, 1 किंवा 2 महिने पुढे ढकलला जाऊ शकतो

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीपा मलिक यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले.
  • क्रीडा मंत्रालय अद्याप राष्ट्रपती भवनच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

यंदाचा २९ ऑगस्ट रोजी होणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा एक-दोन महिन्यांसाठी स्थगित केला जाऊ शकतो. क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, आम्हाला राष्ट्रपती भवनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. समारंभ प्रत्येक वेळी राष्ट्रपती भवनात होताे, ज्यात खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व ध्यानचंद पुरस्काराचे वितरण होते.

कोरोनामुळे यंदा पुरस्कारासाठी पहिल्यांदा ई-मेलद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. नेहमी प्रमाणे नामांकन पाठवण्याची प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे मेमध्ये अर्ज मागवण्यात आले होते.

दरवर्षी वर्षी २९ ऑगस्ट रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. यंदा क्रिकेटपटू रोहित शर्मा, अॅथलिट हिमा दास आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांचे नाव खेलरत्नसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भाला फेकपटू नीरज चाेपडा, टेबल टेनिसपटू मणिका बत्रा आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचे नाव देखील खेलरत्नसाठी प्रस्तावित आहे.