आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Corona Hits Technique Practice; International Wrestling Refery Hints From Dinesh Gund

औरंगाबाद:कोरोनाचा टेक्निक प्रॅक्टिसला फटका; दर्जेदार कामगिरीला धक्का, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांचे संकेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

एकनाथ पाठक 

काेराेनाच्या संकटाचा जगाच्या कानाकाेपऱ्यातील प्रत्येकाला माेठा धक्का बसला अाहे. याचीच माेठी झळ ही देशाच्या स्पाेर्ट््स इव्हेंटला बसत अाहे. यामध्येच देशातील कुस्तीचाही समावेश अाहे. या लाॅकडाऊनच्या काळात देशभरातील मल्लांचा सराव पूर्णपणे बंद अाहे. ते सध्या वैयक्तिक व्यायाम करत अाहेत. मात्र, यातून कामगिरीचा दर्जा उंचावण्यास अडसर निर्माण हाेत अाहे. कारण, त्यांना प्रत्यक्ष लढतीशिवाय अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावणे अाव्हानात्मक अाहे. त्यामुळे या संकटानंतर कसून मेहनत करावी लागणार अाहे. यातूनच दर्जेदार कामगिरी करता येईल, असा माैलिक सल्ला अांतरराष्ट्रीय पंच प्रा. दिनेश गुंड यांनी महाराष्ट्रातील युवा कुस्तीपटू अाणि खेळाडूंना दिला. 

प्रत्यक्षात खेळताना दम लागणार  

सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच खेळाडूंचा मॅट अाणि अाखाड्यातील सराव पूर्णपणे बंद अाहे. टेक्निल प्रॅक्टिसच्या अभावाने खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार अाहे. प्रत्यक्षात कुस्ती खेळण्याचा सराव बंद अाहे. त्यामुळे स्पर्धेतील कुस्ती लढवताना मल्लांना दम लागणार अाहे. त्याला पकड अाणि इतर डावपेच टाकतानाही बाधा निर्माण हाेईल, असेही गुंड यांनी सांगितले. 

युवांची कसरत  

जगावर अाेढावलेल्या या महामारीच्या संकटाने सर्वच जण अडचणीत सापडले अाहे. अशात क्रीडा विश्वातील युवा खेळाडूंना अागामी काळात वर्षभर अधिक मेहनत करावी लागणार अाहे. अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी अाणि असलेला दर्जा कायम ठेवण्यासाठी माेठी कसरत करावी लागेल. यासाठीची मानसिक तयारीही या युवांनी करण्याची गरज अाहे, असेही गंुड यांनी सांगितले. 

Advertisement
0