• Home
  • Sports
  • Corona Impact | Football in new roles: stadiums are empty, guidelines on screen; Hatey increase in injuries

कोरोनाचा परिणाम / फुटबाॅल नव्या भूमिकेत : रिकामे आहेत स्टेडियम, स्क्रीनवर गाइडलाइन; दुखापतीमध्ये हाेतेय वाढ

  • सध्या ९० मिनिटे खेळू शकत नाहीत खेळाडू : युरोपच्या अव्वल पाच लीगमधील फुटबाॅलच्या बुंदेसलिगा शनिवारपासून सुरू

दिव्य मराठी

May 18,2020 09:03:00 AM IST

म्युनिच. शनिवारपासून युरोपमध्ये फुटबॉल सुरू झाले. लॉकडाऊनंतर खेळ दोन-अडीच महिन्यांपूर्वी होता, तसा दिसला नाही. कोरोनाने जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळावर मोठा परिणाम केला. स्टेडियममध्ये आवडता संघ आणि खेळाडूंना समर्थन करताना प्रेक्षक दिसले नाहीत. मैदानावर गळ्यात पडून आनंद व्यक्त करताना खेळाडू. डगआऊट, मैदानाबाहेर, ऑफिशयलचे वर्तन बदलल्या सारखे दिसले. पत्रकारही वेगळ्या पद्धतीने मुलाखत घेताना दिसले. या ८ गोष्टी, ज्या कोरोनादरम्यान बदलल्या....

स्टिकला मायक्रोफोन लावून मुलाखती

टीव्हीचे पत्रकार काठीला मायक्रोफोन लावून दुरूनच खेळाडूंचे व काेचच्या मुलाखती घेत आहेत. मायक्रोफोनला प्लास्टिकचे आवरण आहे. पत्रकार परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.

गळाभेटीऐवजी थम्स अपची निवड:

गोल केल्यानंतर गळ्यात पडून जल्लोष करण्याऐवजी डिस्टन्सिंगचे पालन करत कोपऱ्याने भेट घेत आहेत. खेळाडू एकमेकांना थम्स अपने प्रोत्साहन देताहेत.

खेळाडू ७० मिनिटांत झाले जायबंदी!

दीर्घ विश्रांतीने खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम पडला. अनेक खेळाडू ९० मिनिटे देखील खेळू शकले नाहीत. त्यांना ७० मिनिटांत स्नायू दुखावणे, छोट्या-मोठ्या दुखापती झाल्या.

सरासरी ६० हजार; आता ३०० चाहते:

स्टेडियममध्ये सरासरी ६० हजार चाहते असायचे. आता ३०० लोक आहेत. यात खेळाडू, प्रशिक्षण टीम, बॉल बॉय, सुरक्षा रक्षक व पत्रकार आहे.

स्क्रीनवर कोरोना बाबतीत सूचना

३० चेंडू सॅनिटाइझ : फुटबॉल सामन्यापूर्वी आणि अर्ध वेळादरम्यान सॅनिटाइझ केले जात आहे. ३० चेंडूंचा वापर होतोय. बॉल बॉय चेंडू सॅनिटाइझ करून निश्चित जागी ठेवताय.
स्टेडियममधील स्क्रीन आणि बिलबोर्ड खेळाडूंचे छायाचित्र व व्हिडिओ दाखवले जात होते. आता मात्र, त्यावर कोरोनाची सूचना व माहिती दाखवली जातेय.X