आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Corona Outbreak Lockdown: Eight Tournaments Still Open In Six Countries; Includes Football And Rugby Competitions; Women's League

लॉकडाऊन : तरीही सहा देशांमध्ये आठ स्पर्धा सुरूच; फुटबाॅल व रग्बीच्या स्पर्धांचा समावेश; महिलांची लीग झाली

Sydney/Minsky6 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
सिडनीच्या दाेन्ही क्लबचे खेळाडू.आठ लीग सप्टेंबरपर्यंत रंगणार.
  • स्पर्धेदरम्यान चाहत्यांना प्रवेश नाकारला
  • मेलबर्न सिटीने जिंकला महिला लीग ग्रँड फायनल

सिडनी/मिंस्क - कोरोना व्हायरसचा धाेका लक्षात घेऊन अनेक स्पर्धा रद्दचा निर्णय घेतला आहे. मात्र, या व्हायरसची भीती कायम असतानाही दुसरीकडे सहा देशांत सर्रासपणे आठ स्पर्धा खेळवल्या जात आहेत. यामध्ये फुटबाॅलच्या पाच आणि रग्बीच्या दाेन माेठ्या स्पर्धांचा समावेश आहे. मात्र, या स्पर्धेतील सामन्यादरम्यान काेणत्याही स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश देण्यात आला नाही. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ए लीगचे सामने सुरू आहेत. शनिवारी प्रेक्षकाविना स्टेडियममध्ये वेस्टर्न सिडनी वंडरर्स आणि सिडनी एफसी यांच्यात सामना खेळवला गेला.  ऑस्ट्रेलियामध्ये  काेराेनाे व्हायरसचे  एक हजारपेक्षा अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तरीही ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबाॅल (एएफएल)  आयाेजन कायम आहे. या स्पर्धेला १९ मार्चपासून सुरुवात झाली.

मेलबर्न सिटीने जिंकला महिला लीग ग्रँड फायनल :

ऑस्ट्रेलियामध्ये महिला लीग ग्रँड फायनल सामना ही खेळवण्यात आला. मेलबर्न सिटीने ही फायनल जिंकली.  संघाने फायनलमध्ये सिडनी सिटी एफसीचा १-० ने  पराभव केला. या सामन्यादरम्यान स्टेडियम पूर्णपणे रिकामे हाेते.  खेळाडूंच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने या सामन्याला हजेरी लावली.

ऑस्ट्रेलियात नॅशनल रग्बी लीग : ऑस्ट्रेलियामध्ये नॅशनल रग्बी लीगचे सामने अद्यापही सुरूच आहेत. १२ मार्चपासून लीगला सुरुवात झाली आहे. आज शनिवारी तीन सामने खेळवले जाणार आहेत. 


या फुटबाॅल लीगचे सामने अद्याप  सुरू आ
हेत


देश   :  लीग  :  उर्वरि
त सामने

> ऑस्ट्रेलिया  -  ए-लीग  -  28
> सिंगापूर  -  सिंगापूर लीग  -  95
> अंगोला -  गिराबोला  -  39
> बेलारुस - बेलारुसियन लीग - 74
> पॅलेस्टाईन - गाझा स्ट्रिप कप  - 7
> पॅलेस्टाईन - गाझा स्ट्रिप कप -74

0