आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच जपानमध्ये २३ जुलैपासून ऑलिम्पिक होत आहे. या महामारीने या स्पर्धेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विदेशी खेळाडूंचे प्रशिक्षण आणि जपानच्या वातावरणाची सवय करून घेण्यासाठी ५०० पेक्षा जास्त शहरे व गावांमध्ये शेकडो शिबिरे बनवण्यात आली होती. यासाठी चार वर्षांपासून ४१ हजार गटांना तयार करण्यात आले होते. प्रत्येक संघ व त्यांच्या गरजेनुसार सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाने येथील लोकांचा आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव हिरावला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यास जगभरातील खेळाडू कोठे थांबतील हे अद्याप निश्चित नाही. आधीपासून ठरलेल्या गटांचा पाहुणचार घेतील का, जे २०१६ पासून प्रतीक्षा करत आहेत. टोयामा राज्यातील कुरुम्बे शहरात एक्स्चेंज प्रमोशन विभागाच्या प्रवक्त्या हारुना टेराडा सांगतात, प्रत्येक जण निराश आहे. समुदायाने भारतीय तिरंदाज संघासाठी करार केला होता. करारानुसार भारतीय खेळाडूंना सण-उत्सव, कला व संगीत कार्यक्रम दाखवयाचे होते. तसेच खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयात सोय करण्यात आली होती. आता पुढे काय हे त्यांना माहिती नाही, मात्र कडक नियमांत खेळाडू शहराला भेट देतील असे त्यांना वाटते. मात्र, कोरोना प्रोटोकॉलमुळे स्थानिक विद्यार्थी व रहिवाशांसोबत संपर्क करणार नाहीत. दक्षिण जपानमधील शिमाने राज्यातील इजुमो शहराने भारतीय हॉकी संघासाठी ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिरासाठी ३६ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र आता ही योजना रद्द झाली आहे. शहराचे प्रवक्ते शेरो हसेगावा सांगतात, अनेक वर्षांपासून आम्ही उत्साहित होतो. मात्र सध्याच्या स्थितीत हे शक्य नाही. यामुळे आम्ही ते रद्द केले.
सरकार ठाम, मात्र ऑलिम्पिक सुपरस्प्रेडर ठरण्याची लोकांना भीती : टोकियाे ऑलिम्पिक सुरू होण्यात फक्त १० आठवडे राहिले आहेत. जपानचे लाेक त्याला सुपरस्प्रेडर इव्हेंट म्हणताहेत. अनेक सर्व्हेंमध्ये ८० टक्केपेक्षा जास्त लोक या स्पर्धेच्या बाजूने नाहीत. योजनेनुसार पुढे जाण्यास वचनबद्ध असल्याचे जपान सरकार, टोकियो प्राधिकरण अाणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.