आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Corona | Vaccination | Australia | No Vaccine, No Entry; Strong Decision For Australian Open

ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा:नाे व्हॅक्सिन, नाे एंट्री ;ऑस्ट्रेलियन ओपनसाठी ठाेस निर्णय, 17 जानेवारीपासून स्पर्धेला हाेणार सुरुवात

क्रिस्टाेफर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेविड लसीकरणाची सक्ती करणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही पहिलीच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा

काेराेना महामारीचा वेगाने वाढलेला धाेका आणि त्यानंतर झालेल्या विपरीत परिणामांचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. त्यामुळे हाच धाेका लक्षात घेऊन आता ग्रँडस्लॅमच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सर्वात माेठा निर्णय जाहीर करण्यात आला. या स्पर्धेदरम्यान “नाे व्हॅक्सिन, नाे एंट्री’ हा कडक दंडक करण्यात आला. पुढच्या वर्षी १७ ते ३० जानेवारीदरम्यान ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेदरम्यान सहभागी हाेणाऱ्या सर्वच टेनिसपटूंना काेविड व्हॅक्सिन सक्तीची करण्यात आली आहे. यातून लसीकरण केलेल्या टेनिसपटूंनाच स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. पुढच्या वर्षी सत्रातील पहिल्याच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेने हा कडक नियम लागू केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारी ही पहिलीच जागतिक दर्जाची टेनिस स्पर्धा आहे.

आयाेजकांच्या या कडक नियमावलीमुळे आता जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचा या स्पर्धेतील सहभाग संशयाच्या भाेवऱ्यात सापडला. कारण, त्याने लसीकरणाला प्रचंड विराेध दर्शवला आहे. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये काेराेना महामारीच्या बाबतीत प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. यातूनच या ठिकाणी लसीकरण माेहीम सक्तीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया स्पर्धेचे संचालक क्रेग टिली यांनी दिली.

नऊ वेळच्या चॅम्पियन नाेवाक याेकाेविकसमोर आता सहभागाचा पेच
नऊ वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नाेवाक याेकाेविकची नजर सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम किताबाकडे लागली आहे. मात्र, यासाठीची त्याची वाट अधिकच खडतर आहे. कारण त्याने अद्याप काेविड व्हॅक्सिन घेतलेली नाही. त्याचा या लसीकरणाला प्रचंड विराेध आहे. त्यामुळे त्याचा या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. कारण आयाेजकांनी व्हॅक्सिन सक्तीची केली आहे. तसेच त्याला या स्पर्धेत माघार घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.

८० टक्के पुरुष खेळाडूंचे लसीकरण :
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. आतापर्यंत जागतिक क्रमवारीच्या टाॅप-१०० मधील ८० टक्के पुरुष खेळाडूंचे लसीकरण यशस्वी झालेले आहे. फक्त २० टक्के पुरुष खेळाडूंनी अद्याप लसीचे डाेस घेतले नाहीत. तसेच महिलांच्या गटातही लसीकरणाबाबत माेठी जनजागृती झालेली आहे. यातूनच या गटात ७० टक्के महिला खेळाडूंनी व्हॅक्सिन घेतलेली आहे. त्यामुळे अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा या स्पर्धेतील सहभागाचा मार्ग सुकर झालेला आहे. मात्र, उर्वरित २० टक्के खेळाडूंसमाेर माेठा पेच निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...