• Home
  • Sports
  • Corona Virus : 541 matches can be canceled; 33 thousand crores will be damaged

कोरोना व्हायरस : 541 सामने होऊ शकतात रद्द; 33 हजार कोटी रुपयांचे होईल नुकसान

मोकळ्या वेळेत रोनाल्डो मुलासह सराव करताना. मोकळ्या वेळेत रोनाल्डो मुलासह सराव करताना.

  • ईएफएल, ला लिगा, बुंदेसलिगा, सीरी ए, लीग वन एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 20,2020 12:13:00 PM IST

लंडन - केवळ एक आठवड्यापूर्वी युरोपमध्ये कोरोना व्हायरसमुळे इटली व स्पेनच्या फुटबॉल लीग बंद दाराआड खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मार्चच्या मध्यापर्यंत सर्वच खेळांवर व्हायरसचा प्रभाव पडला. अव्वल ५ युरोपियन फुटबॉल लीगच्या सोबत यूएफा चॅम्पियन लीग व युरोपा लीग स्पर्धा एप्रिलपर्यंत टाळल्या आहेत. हॉलंडच्या अकाउंटिंग फर्म केपीएमजीनुसार, कोरोना व्हायरसमुळे युरोपियन फुटबॉलला आर्थिक बाबतीत खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. जर अव्वल ५ लीग रद्द झाल्या, पुन्हा सामने सुरू झाले नाही तर, या लीगला ४.३३ बिलियन डॉलर (३२ हजार ६१७ कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागेल. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश ला लिगा, जर्मन बंुदेसलिगा, इटालियन सीरी ए, फ्रेंच लीग वन, चॅम्पियन लीग व युरोपा लीगचे ५४१ सामने रद्द होऊ शकतात. इंग्लिश प्रीमियर लीगला १.२५ बिलियन युरोचे नुकसान होईल.


अकाउंटिंग फर्मकडून खर्चाचा केला अभ्यास

केपीएमजीने पाच लीगच्या उर्वरित सामन्यांच्या खर्चाचा अभ्यास केला. त्यांचे विश्लेषण केले, सामन्याच्या दिवशी प्रक्षेपण व व्यावसायिक कमाई किती होते. याच आकड्यावरून त्यांनी सर्व ५ लीगला ३.४५ ते ४ बिलियन युरोपर्यंत नुकसान सोसावे लागेल. अहवालानुसार, करार कंपन्या पैस परत मागू शकतात.


इंग्लिश फुटबॉल लीगची ४३२ कोटी रु. मदत

इंग्लिश फुटबॉल लीगने ५० मिलियन पाउंडची (४३२ कोटी रुपये) मदत जाहीर केली. ही रक्कम प्रीमियर लीगद्वारे छोट्या क्लबला देण्यात येईल. ईएफएलने बैठकीनंतर म्हटले, “सध्या त्यावर कायमस्वरूपी तोडगा नाही. त्यामुळे त्वरित अडचण सोडवण्यासाठी मदत जाहीर केली.


स्कॉटिश क्लबकडून खेळाडूंच्या पगारात कपात

स्काॅटलंडचा फुटबॉल क्लब हर्ट ऑफ मिडलोथिमान एफसीने आपल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांचा पगार कमी केला. हा पगार कमी करणारा ब्रिटनचा पहिला फ्लाइट क्लब बनला. क्लबचे मालक एन बजने म्हटले, “आर्थिक अडचणींमुळे खर्च कपातीचा निर्णय घेतला. क्लबला १.१६ मिलियन डॉलर नुकसान झाले आहे.

X
मोकळ्या वेळेत रोनाल्डो मुलासह सराव करताना.मोकळ्या वेळेत रोनाल्डो मुलासह सराव करताना.