आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इतिहासात पहिल्यांदाच आॅलिम्पिक स्पर्धा स्थगित; वर्षभरासाठी लाॅकडाऊन, 34 हजार काेटींचा फटका

Japan6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी आॅलिम्पिकचे आयाेजन युद्धामुळे तीन वेळा झाले हाेते रद्द

टाेकियाे - जीवघेण्या काेराेना व्हायरसच्या वाढत्या धाेक्याचा आता क्रीडा विश्वातील पंढरीला माेठा फटका बसला आहे. या महामारीमुळे आतापर्यंतच्या १२४ वर्षांच्या आॅलिम्पिकच्या इतिहासाला धक्का देणारा निर्णय घ्यावा लागला आहे. जपानमध्ये हाेणारी यंदाची टाेकियाे आॅलिम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ही स्पर्धा पुढच्या वर्षी २०२१ मध्ये हाेणार आहे. यामुळे पॅरालिम्पिक स्पर्धेलाही स्थगिती देण्यात आल्याची अधिकृत अशी घाेषणा जपानचे पंतप्रधान शिंजाे आबे यांनी मंगळवारी केली. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थाॅमस बाक यांच्यासाेबतच्या सखाेल चर्चेनंतर पंतप्रधान शिंजो आबे यांनी हा निर्णय जाहीर केला.  आता या स्पर्धेची क्रीडा ज्याेत जपानमध्येच कायम राहणार आहे.या स्पर्धेच्या स्थगितीमुळे जपानला ३४ हजार काेटींचा फटका बसणार आहे. जागतिक महायुद्धामुळे तीन वेळा आॅलिम्पिकची स्पर्धा रद्द करण्यात आली हाेती. मात्र, स्थगित पहिल्यांदाच करण्यात आली आहे. आयआेसीच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा यंदा जपानमध्ये २४ जुलै ते ९ आॅगस्टदरम्यान आयाेजित करण्यात आली हाेती. स्पर्धेदरम्यान जपानमध्ये सहा लाखांपेक्षा अधिक पर्यटकांच्या आगमनाची शक्यता हाेती. यातून हाेणाऱ्या कमाईलाही फटका बसला आहे.

२०० देशांचे १५ हजार खेळाडू सहभागी
आॅलिम्पिक स्पर्धेत २०० पेक्षा अधिक देशांच्या १५ हजारांपेक्षा अधिक खेळाडूंच्या सहभागाची शक्यता आहे. यामध्ये ११ हजार खेळाडू आॅलिम्पिक आणि उर्वरित ४४०० खेळाडू पॅरालिम्पिकचे आहेत. जपानला दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. यापूर्वी १९६४ मध्ये पहिल्यांदा जपानने हे यजमानपद भूषवले हाेते. १९४० मध्येही जपानला ही संधी मिळाली हाेती. मात्र, महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द झाली हाेती.

आतापर्यंत ७६ हजार काेटींचा खर्च
यजमान जपानने आताच्या स्पर्धा आयाेजनासाठी आजपर्यंत ७६ हजार काेटींचा खर्च केला आहे. आता वर्षभरासाठी ही स्पर्धा स्थगित झाली आहे. त्यामुळे आता जपानला आर्थिक कमाईसाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानांची वर्षभरापर्यंत याेग्य प्रकारची निगा राखावी लागणार आहे. याचा जपानच्या आर्थिक परिस्थितीवर माेठा परिणाम होणार आहे.

0