आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:हिंगाेलीविरुद्ध नाशिक 1 बाद 145 धावांसह मजबूत स्थितीत

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमसीएतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित वरिष्ठ गट निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक संघ आता हिंगोली विरुद्ध मजबूत स्थितीत पोहोचवले. बिडकीन येथे सुरू असलेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी हिंगोली संघाने ३६.२ षटकांमध्ये सर्वबाद १६९ धावा काढल्या. सामन्यादऱ्यान अचानक पावसाने हजेरी लावली. यादरम्यान नाशिक संघाने १७.४ षटकांत १ बाद १४५ धावा उभारल्या. संघ अद्याप २४ धावा मागे आहे.

हिंगोली संघाचा कर्णधार शुभम जाधवने ३० धावा केल्या. प्रतीक बोधगिरेने ३४ धावा काढल्या. शुभम व प्रतीक जोडीने ६९ धावांची सलामी दिली. समर्थ निकमने ३४ व सनी पंडितने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. नाशिक संघाच्या तन्मय शिरोडेने ४१ धावा देत ८ फलंदाजांना तंबूत पाठवले. कर्णधार सत्यजित बच्छावने २ गडी बाद केले. नाशिक संघाकडून पहिल्या डावात सलामीवीर शेख यासीर व मुर्तुझा ट्रंकवाला या रणजीपटू जोडीने (१४०) शतकी भागीदारी केली. या माेठ्या भागीदारीमुळे त्यांनी संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. यासेरने ४२* धावा केल्या. यादऱ्यान मुर्तुझाने ६१ चेंडूंमध्ये १० चौकार व ६ षटकार मारत शानादर ९६ धावा ठोकल्या. तसेच कुणाल कोठवडे ३ धावांवर खेळत आहे.

बातम्या आणखी आहेत...