आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Corona; Sourav Ganguly Home Quarantine After Elder Brother Snehasish Ganguly Corona Test Positive

गांगुलीच्या घरात कोरोना:मोठ्या भावाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सौरव गांगुली होम क्वारेंटाइन

कोलकाता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौरव गांगुली आणि मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली
  • माजी क्रिकेटर स्नेहाशीष गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी)चे जॉइंट सेक्रेटरी आहेत
  • पत्नी आणि सासरे संक्रमित झाल्यानंतर स्नेहाशीष सौरवसोबत त्याच्या घरात राहण्यासाठी आला होता

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीषची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आळी आहे. यानंतर सौरवने बुधवारी स्वतःला होम क्वारेंटाइन केले आहे. माजी क्रिकेटर स्नेहाशीष क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी)चे जॉइंट सेक्रेटरी आहेत.

बीसीसीआय अध्यक्ष सौरवच्या जवळच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''स्नेहाशीषची रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आली. तब्येत आणि गाइडलाइंसला लक्षात घेत सौरवने स्वतःला होम क्वारेंटाइन केले आहे.''

सीएबी अधिकाऱ्याने केली पुष्टी

बंगालकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या स्नेहाशीषला बेले व्यू हॉस्पिटलमध्ये अॅटमीट केले आहे. याच हॉस्पीटलने त्यांची कोरोना रिपोर्ट दिली होती. सीएबी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थांना स्नेहाशीष कोरोना संक्रमित असल्याची पुष्टी केली.

सौरवसोबत राहत होते स्नेहाशीष

स्नेहाशीष आधी मोमिनपुरामध्ये पत्नी आणि सासऱ्यांसोबत राहत होते. त्या दोघांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्नेहाशीष कोलकातामधील घरात शिफ्ट झाले होते. या घरात ते सौरवसोबत राहत होते, स्नेहाशीषच्या संपर्कात आल्यामुळे सौरवने स्वतःला क्वारेंटाइन केले आहे.