आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fights History Explained; Gautam Gambhir Virat Kohli Fight | Controversial Moments | Virat Kohli

क्रिकेटचे किस्से:गौतम गंभीर - विराट कोहलीच्या वादाने क्रिकेटची प्रतिष्ठा पणाला, वाचा क्रिकेटच्या इतिहासातील 5 लज्जास्पद घटना

स्पोर्ट डेस्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट अनिश्चिततांनी भरलेला खेळ आहे. कदाचित यामुळेच त्याला जंटलमन गेम म्हटले जाते. पण अनेकदा काही खेळाडू व स्टेडिअममधील प्रेक्षकांमुळे या खेळाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. आयपीएलच्या बंगळुरू - लखनऊतील सोमवारच्या सामन्यात गौतम गंभीर व विराट कोहलीच्या भांडणाने क्रिकेटपुढे पुन्हा एकदा ही स्थिती उद्धवली.

क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आपसांत भिडल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक सामन्यांत खेळाडूंमध्ये तू-तू मै-मै झाले आहे. चला तर मग पाहूया क्रिकेटच्या प्रतिष्ठेला तडा देणाऱ्या 5 लाजिरवाण्या घटना...

1 - पोलार्डने स्टार्कवर भिरकावली बॅट

आयपीएलच्या 7 व्या हंगामात म्हणजे 2014 मध्ये वानखेडे स्टेडिअमवर मुंबई व बंगळुरुत सामना सुरू होता. मुंबईच्या डावातील 17 व्या षटकात मिशेल स्टार्कचा चेंडू खेळताना पोलार्डने आपली बॅट त्याच्या दिशेने फेकून मारली. नशिबाने ती स्टार्कपर्यंत पोहोचली नाही. तो जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला. स्टार्कच्या स्लेजिंगला कंटाळून पोलार्डने हे पाऊल उचलले होते. त्यानंतर पोलार्डवर सामना शुल्काच्या 75 टक्के व स्टार्कवर सामना शुल्काच्या 50 टक्के दंड लावण्यात आला होता.

2 - क्रिकेटमधील लज्जास्पद घटना, सेंच्युरी दुर्लक्षित

1 फेब्रुवारी 1981 रोजी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये 'बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड सिरीज कप'चा अंतिम सामना खेळला जात होता. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चॅपल यांनी ओव्हर टाकणाऱ्या ट्रेव्हर चॅपल या आपल्या भावाला अंडरआर्म चेंडू टाकण्याची सूचना केली. त्या दिवसांत अंडरआर्म चेंडू वैध मानला जात होता.

पण खेळ भावना जपण्यासाठी तो टाकला जात नव्हता. ब्रायन मॅकेनी स्ट्राइकवर होता. अंडरआर्म चेंडू खेळताना त्याने रागात बॅट झटकली. नॉनस्ट्रायकर एंडवर एगर उभा होता. एगर 102 धावांवर नाबाद परतला होता. त्याने न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले होते. पण अंडरआर्मच्या घटनेमुळे त्याची सेंच्युरी फार कमी लोकांच्या लक्षात राहिली. या सेंच्युरीकडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात दुर्लक्षित सेंच्युरी म्हणूनही पाहिले जाते.

3 - प्रेक्षकांची मैदानात धाव

अशीच एक घटना ऑस्ट्रेलिया - वेस्ट इंडिजमधील एका एकदिवसीय सामन्यात घडली होती. या सामन्यात प्रेक्षकांनी उत्साहाच्या भरात थेट मैदानात धाव घेतली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा बॅट्समन स्टीव्ह वॉला रनही पूर्ण करता आला नव्हता. तो क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच प्रेक्षकांनी मैदानात धाव घेऊन यष्ट्या उखडल्या होत्या. तसेच या गर्दीतील कुणीतरी स्टीव्ह वॉची बॅटही घेऊन पोबारा केला होता. यामुळे स्टीव्ह वॉ भयग्रस्त झाला होता. मैदानावर फिल्डींग करणारे वेस्ट इंडिजचे खेळाडूही मैदानातून पळून गेले होते.

स्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की, पोलिसांना मैदानात धाव घ्यावी लागली होती. ही स्थिती क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खराब व लज्जास्पद घटना म्हणून ओळखली जाते. पोलिसांनी वेळीच धाव घेतली नसती, तर त्या दिवशी क्रिकेटच्या मैदानात काहीही झाले असते, असे म्हटले जाते.

4 - क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी बेईमानी

क्रिकेटच्या इतिहासात एक घटना सर्वात मोठ्या बेईमानीचीही घडली होती. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजमध्ये मॅच सुरू होता. तेव्हा विंडिजच्या खेळाडूंनी असे काही केले की संपूर्ण क्रिकेट जगत व त्यांचा संघाला लाजिरवाण्या स्थितीला सामोरे जावे लागले होते. हा वनडे मॅच एससीजी ग्राउंडवर खेळला गेला होता.

ऑस्ट्रेलियन फलंदाजाने शॉट मारताच गोलंदाज रोजर हार्परने कॅच पकडण्याचा कसोशिने प्रयत्न केला. पण त्यात चेंडू त्याच्या हातातून निसटून जमिनीवर पडला. पण हार्परने बेईमानी करत हा झेल पकडण्याचा दावा केला. त्यावर पंचांनी आपसात चर्चा करून गोलंदाज व प्रतिस्पर्धी संघाची फलंदाज बाद झाल्याची मागणी फेटाळून लावली. रिप्लेमध्येही चेंडूने जमिनीला स्पर्श केल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. या सामन्यानंतर रोजर हार्परवर क्रिकेटच्या दिग्गजांनी चौफेर टीका केली होती.

5 - वॉर्न व सॅम्युअल्सचे भांडण

बीबीएलच्या 2013 च्या एका सामन्यात डेव्हीड हसी दुसरी धाव घेण्यासाठी पळण्याच्या प्रयत्नांत असताना गोलंदाजी करणाऱ्या सॅम्युअल्सने अचानक त्याचे टी-शर्ट ओढून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून शेन वॉर्नचा राग अनावर झाला होता. दोन्ही खेळाडू एकमेकांपुढे आल्यानंतर वॉर्नने सॅम्युअल्सचे टी-शर्ट पकडून त्याला शिवीगाळ केली. दोघांत लाइव्ह मॅचमध्ये बराच काळ वाद झाला.

याच सामन्यात वॉर्नच्या एका थ्रोमुळे सॅम्युअल्सचा तोल ढळला. त्याने संतापात त्याला बॅट फेकून मारली. या घटनेचा व्हिडिओही तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता.