आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाची तयारी सुरू झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे १३ मार्चपासून एकही सामना झाला नाही. ८ जुलैपासून इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यात मँचेस्टरमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. मात्र, आता क्रिकेट पूर्णपणे बदलले जाईल. कोरोनामुळे बायो सिक्योर सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. पहिले खेळाडू सराव करत होते, तेव्हा अनेक लोक असत. आता मात्र खेळाडू व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही नसतील. मैदानावर हाताने काम करावे लागणारे धावफलक होते. सामन्यापूर्वी त्याचे रंगकाम होत असे. मात्र, आता इलेक्ट्रॉनिक धावफलक आले आहेत. ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असत, आता सुरक्षेमुळे सर्वांचे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातील. त्याचप्रमाणे खेळाडू व पंचांकडे सॅनिटायझर पाहायला मिळेल. कसोटी मालिकेदरम्यान चाहत्यांना परवागनी नाही. अशात खेळाडूंना बळी घेतल्यावर, शतक बनवल्यनंतर, संघाला सामना जिंकल्यानंतर मैदानावर संभाळून जल्लोष करावा लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.