आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपल्याला लवकर अाणि वेळेत स्थानिक क्रिकेट सुरू करावे लागेल. कोरोनामुळे मार्चपासून क्रिकेट बंद आहे, असे जागतिक विजेता संघ सहभागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने म्हटले. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सनने म्हटले की, चेंडूमुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) ४ जुलैपासून पुन्हा खेळ सुरू करण्यासाठी सरकारशी बोलत आहे. ‘अनेक लोक क्रिकेटच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहे. आम्ही बेन स्टोक्स व जो रूट सारखे मोठे खेळाडू गमावू शकत नाही. स्थानिक पातळीवर अशाप्रकारचे खेळाडू तयार हाेतात.’ ३० वर्षीय गोलंदाजाने म्हटले, जेव्हा आपण पब व हॉटेलमध्ये जाऊ शकतो तर, अपेक्षा करू शकतो की, क्रिकेट देखील लवकर पुनरागमन करेल,असे वूड म्हणाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.