आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉल फीव्हरच्या मस्तीत असलेल्या अमेरिकेतही जुलैपासून क्रिकेटचे असेच वेड पाहायला मिळणार आहे. १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटसाठी (एमएलसी) स्टेडियम निश्चित झाले आहे. सर्व ६ संघांनी लोगो लाँच केले आहेत. लीगमध्ये १७ दिवसांत १९ सामने होतील. ७ लाख प्रेक्षक आणि १६ हजार ४०० कोटी कमाईचा अंदाज आहे. संपूर्ण कार्यक्रम मेमध्ये प्रसिद्ध होईल.
विशेष बाब म्हणजे एमएलसी ऑस्ट्रेलियाचे बिग बॅश, इंग्लंड आणि वेल्सचे द हंड्रेड व यूएईतील आयएलटी२० सारख्या स्पर्धेइतकेच वेतन देण्यास सक्षम आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघाची वेतन कॅप सुमारे १२.५ कोटी रुपये आहे. स्पर्धेतील सुरुवातीची गुंतवणूक सुमारे ९८० कोटी रुपये करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांमध्ये भारताचे काही प्रभावशाली समर्थकही आहेत. यात मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलाही आहेत, आयपीएल क्लबच्या मालकांचे सहा एमएलसी संघांपैकी चार संघांमध्ये हिस्सेदारी आहे. स्पर्धा विशेषदेखील आहे. कारण २०२४ मध्ये यूएस आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आयोजित करणार आहे. यासाठी ग्रँड प्रेयरी बेसबॉल स्टेडियम १६३ कोटी रुपये खर्चातून बदलले आहे. एमएलसीचे मार्केटिंगचे उपाध्यक्ष टॉम डनमोर म्हणतात, ‘आम्ही क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी आणि जाहिरात करण्यासाठी हे प्रयत्न केले आहेत. शाहरुख आणि नडेला यांच्यासारख्या दिग्गजांच्या गुंतवणुकीमुळे ही लीग चर्चेत आली. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हायटेक गेम्सही आणले जात आहेत.
क्रिकेट वाढवण्यासाठी न्यूयॉर्कने कायदा केला, टेक्सास होतोय हब
उत्तर टेक्सास क्रिकेटची राजधानी असल्याचा दावा करत आहे. डनमोर म्हणतात “तिथे क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंचा सक्रिय समुदाय आहे,” डलास क्रिकेट लीग आणि नॉर्थ टेक्सास क्रिकेट असो. सोबत क्रिकेटप्रेमी दक्षिण आशियाई लोकांमुळे लोकप्रियता वाढली आहे. देशातील पहिले व्यावसायिक क्रिकेट स्टेडियम ‘ग्रँड प्रेरी’ येथे आहे. त्यात १५ हजार जागा, १ हजार प्रीमियम सीट्स आणि जागतिक दर्जाच्या क्रिकेट सुविधा आहेत. दरम्यान, न्यूयॉर्कचे गव्हर्नर ॅैथी होचुल यांनी अलीकडेच एका कायद्यावर स्वाक्षरी केली. ज्यात क्रिकेटला राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी २००८ मध्ये, न्यूयॉर्क शिक्षण विभागाने ३० हून अधिक संघांचा देशातील पहिला सार्वजनिक शाळा क्रिकेट कार्यक्रम तयार केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.