आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket News And Update;Mahendra Singh Dhoni Announced His Retirement From International Cricket

क्रिकेटमधून निवृत्ती:माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार- धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. शनिवारी धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहीले की, तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज संध्याकाळी 7. 29 पासून मला निवृत्त झालो असल्याचे समजा.

महेंद्रसिंह धोनीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या बॅकग्राऊंडलाही त्याच्या आवडीचे 'पल दो पल का शायर हूं' हे गाणे वाजत आहे.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे.

गांगुली कॅप्टन्सीमध्ये केला डेब्यू

धोनीने पहिला मॅच 23 डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशविरोधात चटगावमध्ये खेळला होता. तेव्हा गांगुली संघाचा कर्णधार होता. गांगुलीने आपल्या ऐवजी धोनीला नंबर-3 वर बॅटिंगसाठी पाठवले होते. परंतू, धोनी त्या सीरीजमध्ये फ्लॉप ठरला होता. त्याने तीन सामन्यात फक्त 19 धावा काढल्या होत्या, परंतू पुढच्या सीरीजमध्ये पाकिस्तानविरोधात 123 बॉलवर 148 धावांचा डोंगर केला होता.

90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 खेळले

धोनीने आतापर्यंत 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या. धोनीने आयपीएलमध्ये आतापरयंत 190 सामन्यात 4432 धावा केल्या. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये सीएसकेने सलग 2010 आणि 2011 मध्ये आयपीएल किताब आपल्या नावे केला होता.

बातम्या आणखी आहेत...