आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकून 4 टेस्टची मालिका 2-1 ने खिशात घातली. या विजयासह भारताने एक इतिहास रचला आहे. भारत ऑस्ट्रेलियामध्ये सलग 2 सीरीज जिंकणारा ओव्हरऑल चौथा आणि आशियातील पहिला देश बनला आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलियामध्ये सलग 9 कसोटी मालिकेत पराभूत झाला आहे. तर, श्रीलंका सलग 7 टेस्ट सीरीज हरला आहे.
टीम | ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत विजय | किती फरकाने विजय |
इंग्लँड | 1884-85, 1886-87 आणि 1887-88 | 3-2, 2-0, 1-0 |
वेस्टइंडीज | 1984-85, 1988-89 आणि 1992-93 | 3-1, 3-1, 2-1 |
साउथ आफ्रीका | 2008-09, 2012-13 आणि 2016-17 | 2-1, 1-0, 2-1 |
भारत | 2018-19 आणि 2020-21 | 2-1, 2-1 |
इंग्लँडने 132 वर्षांपूर्वी 3 सीरीज जिंकल्या होत्या
भारतापूर्वी इंग्लँड, वेस्टइंडीज आणि साउथ आफ्रीकेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात सलग तीनवेळा पराभूत केले आहे. इंग्लँडने 1884-85, 1886-87 आणि 1887-88 मध्ये, वेस्टइंडीजने 1984-85, 1988-89 आणि 1992-93 मध्ये, तर साउथ आफ्रीकेने 2008-09, 2012-13 आणि 2016-17 मध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे.
भारताशिवाय आशियातील कोणत्याच देशाने 2 सीरीज जिंकल्या नाहीत
भारत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात दोन सीरीजमध्ये पराभूत करणारा आशियातील पहिला संघ बनला आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2018-19 आणि आता 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोध कसोटी मालिका जिंकली. आशियातील कोणत्याच देशाने ऑस्ट्रेलियाला दोन मालिकेत पराभूत केले नाही. पाकिस्तान ऑस्ट्रेलियामध्ये एकही सीरीज जिंकू शकला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.