आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket News; Former Left Arm Spin Legend Rajinder Goel Passed Away In Rohtak

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:रणजीमध्ये 700 पेक्षा ज्यास्त विकेट्स घेणारे एकमात्र गोलंदाज राजिंदर गोयल यांचे निधन

स्पोर्ट डेस्क10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआयसह अनेक माजी क्रिकेटर्सनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे राजिंदर गोयल यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 77 वर्षीय फिरकीपटू राजिंदर यांनी रणजीमध्ये 750 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत इतर कोणताच गोलंदाज 600+ विकेट घेऊ शकला नाही. बीसीसीआयसह अनेक माजी क्रिकेटर्सनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, ‘‘आपण डोमेस्टीक क्रिकेटमधले दिग्गज व्यक्तीमत्व गमावले. त्यांचा रेकॉर्ड सांगती की, ते किती उत्तम गोलंदाज होते. 25 पेक्षा जास्त वर्षे त्यांनी क्रिकेट खेळले. यावरुन त्यांचे खेळाप्रती समर्पण समजते.’’

राजिंदर यांनी रणजीच्या एका सीजनमध्ये 15 वेळा 25+ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 157 सामन्यात 750 विकेट्स घेतल्या. एका डावात 55 रन देऊन 8 विकेट्स त्यांचा बेस्ट स्कोअर होता. तसेच, त्यांनी 59 वेळा 5 विकेट आणि 18 वेळा 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. गोलंदाजीसोबतच फलंदाजी करिअरमध्ये त्यांनी 1037 रन्स काढले आहेत.

भारतासाठी एकदाही खेळले नाही

राजिंदर गोयल यांनी पतियाळा, पंजाब आणि दिल्लीकडूनही खेळले आहे. परंतू, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. यावर बोलताना त्यांनी मागे एकदा म्हटले होते की, 'मी चुकीच्या काळात जन्म घेतला. बिशन सिंह बेदी संघात असताना माझे खेळणे अवघड होते.' 

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी ट्वीट केले, उत्तम गोलंदाज, ज्यांनी अचूक लाइन लेंथने नेहमी फलंदाजांनी सळो की पळो केले.

माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही ट्वीट केले, अतिशय विनम्र व्यक्ती, 750 फर्स्ट क्लास विकेट घेतल्या, पण कधी भारतासाठी खेळले नाही. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

बातम्या आणखी आहेत...