आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket News; Ishant Sharma Instagram Post From 2014 Confirms Darren Sammys Allegations Of Racism

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्णभेदी टीका:डैरेन सॅमीला इशांत शर्माने म्हटले होते 'काळू', शर्माची जुन्ही इंस्टाग्राम पोस्ट झाली व्हायरल

स्पोर्ट डेस्क9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इशांत शर्माची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे, त्यात तो सॅमीसोबत दिसत आहे

वेस्टइंडीजचा खेळाडून डैरेन सॅमीने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरुन आयपीएलमध्ये त्याच्यावर वर्णभेदी टीका झाल्याचा खुलासा केला होता. सॅमीने सांगितले की, काही खेळाडू त्याला काळू म्हणायचे. तो म्हणाला की, 'आता मला 'काळू'चा अर्थ समजला आहे, मी खूप रागात आहे.' सॅमीने  याबाबत एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यातही त्याने हेच म्हटले होते. 

तो म्हणाले की, 'जे लोक मला काळू म्हणायचे, त्यांच्याकडून मला आता उत्तर हवे आहे. मी नाव सांगण्यापुर्वीच त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. त्यांनी मला सांगावं की, तो शब्द त्यांनी प्रेमाने उच्चारला होता का?' सॅमीच्या या खुलाशाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन असे दिसते की, आयपीएलमध्येही वर्णभेदी टीका केली जाते. दरम्यान, इशांत शर्माची एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात तो सॅमीसोबत दिसत आहे.

View this post on Instagram

Me, bhuvi, kaluu and gun sunrisers

A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29) on May 14, 2014 at 9:18am PDT

इशांत शर्माने फोटोच्या कॅप्शनमध्ये काळू शब्दाचा वापरदेखील केला आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहीले की, 'मी, भूवी, कालू आणि गन सनराइजर्स'. इशांत शर्माच्या या जुन्या फोटोवर अनेकांनी कमेंट करुन, त्याला हा फोटो डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...