आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या किरॉन पोलार्डचा आज वाढदिवस. वयाची पस्तीशी पूर्ण करणाऱ्या या खेळाडूची ओळख भारतीयांसाठी आता MI चा खेळाडू म्हणून अधिक मोठी झाली आहे. 2010 मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झालेल्या किरॉन पोलार्डचा संघर्ष मात्र त्याच्या खेळापेक्षा मोठा आहे. पोलार्डच्या लहानपणीच वडिलांनी घर सोडले होते ते परत कधीही न येण्यासाठीच.अशा परिस्थितीत पोलार्डच्या प्रवासाला सुरुवात झाली. 12 मे 1987 साली त्रिनिदादमध्ये पोलार्डचा जन्म झाला.
...आणि पोलार्डला त्याचं ध्येय मिळालं
कदाचित त्यावेळी जन्मलेला हा नवजात बालक इतिहास घडवेल असं कुणाला वाटलं देखील नसेल. घरात मोठी बिकट परिस्थिती, दोन वेळच्या जेवणाची पण भ्रांत होती. स्वप्न मोठी होती पण आणि स्वप्नांपेक्षा रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होता. पोलार्डच्या आईने आपल्या दोन मुली आणि एका मुलाची जबाबदारी आपल्या एकट्या खांद्यावर घेत टुनापूना-पिआरको गाठलं. खरं तर इथेच पोलार्डला त्याचं ध्येय मिळालं. पोलार्डला स्वतःसोबतच त्याच्या कुटुंबाला सुद्धा सावरायच होतं. आव्हानं अनेक होती आणि त्यातच एक मोठं आव्हान म्हणजे वाईट सवयी आणि व्यसनं यापासून स्वतःला दूर ठेवणं. घरात अठराविश्वे दारिद्र्य होतं आणि त्यात जर अशा व्यसनाधीनतेची भर पडली असती तर कदाचित आज जगासमोर पोलार्ड नावाचं वादळ उभं राहण्यापूर्वीच शांत झालं असतं.
क्रिकेट हा पोलार्डसाठी एक महागडा खेळ होता
आयुष्यात अनेकवेळा आपल्यासमोर दोन पर्याय असतात, त्यातलं एक निवडणं आणि त्यात स्वतःला झोकून देणं हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. पोलार्ड समोरही असे दोन पर्याय होते एक चांगला आणि एक वाईट. क्राईम, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या, अनेक व्यसनं हा सहज आणि सोपा मार्ग पंरतू आयुष्य उदध्वस्त करणाऱ्या गोष्टी तर दुसरीकडे कठीण, खडतर पण मेहनतीचा मार्ग जिथे वेळोवेळी तूम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल पण भविष्य उज्वल असेल. त्यात पोलर्डने दुसरा मार्ग निवडला तो म्हणजे क्रिकेट आणि इथूनच त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. खरंतर क्रिकेट हा पोलार्डसाठी एक महागडा खेळ होता. तर पोलार्डचं ध्येय हे केवळ टेस्ट क्रिकेट आणि वनडे क्रिकेट पुरतच मर्यादित होतं. लहानपणा पासूनच उंच खांदाबांधा व मजबूत शरीरयष्टी या दोन नैसर्गिक बाबींमुळे पोलार्डचे षटकारही नैसर्गिक वाटायचे. चौके आणि षटकारांच्या जोरावर सामने जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात होती.
असा बनला पोलार्ड षटकारांचा बादशाह
वर्ष 2006 मध्ये पोलार्डला वेस्टइंडीजच्या अंडर 19 संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर टी-20 क्रिकेट सारखा नवा खेळ पोलार्डला अनुभवायची संधी मिळाली.आज किरॉन पोलार्ड हा षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. पोलार्डच्या या दमदार खेळीवर सिलेक्टर्सची नजर पडली नसेल तर नवलच. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी पोलार्डला वेस्टइंडिज वन-डे टीम मध्ये संधी मिळाली. यानंतर किरॉन पोलार्डला मागे वळून पाहण्याची गरज नाही पडली. 15 वर्षांच्या करिअरमध्ये पोलार्डने आपलं ध्येय नक्कीच मिळवलं आहे. आयुष्यभर कष्ट करून पोलार्डला त्याच्या पायावर उभं करणाऱ्या आईला तिच्या परिश्रमाचे चीज करुन दाखवलं. क्रिकेटने त्याचे आयुष्य बदलून टाकले आणि पोलार्डने क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.