आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणातुंगानंतर आता माजी क्रिडामंत्री महिंदानंदा अलुथगामा यांनी 2011 वर्ल्ड कप फायनल फिक्स असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, त्यावेळेस मी क्रिडामंत्रीह होतो, पण मला विश्वास आहे की, तो सामना फिक्स होता. तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.
जयवर्धनेने ट्वीट केले, बहुतेक निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्कस सुरू झाली आहे. नाव आणि पुरावे सादर करा. महिंदानंदा 2010 ते 2015 पर्यंत क्रिडा मंत्री होते आणि सध्या ते श्रीलंकेचे उर्जामंत्री आहेत. त्यांनी श्रीलंकेतील सिरसा टीव्हीसोबत बातचीतदरम्यान वर्ल्ड कप फायनल फिक्स असल्याचे म्हटले आहे.
'आम्ही 2011 मध्ये जिंकलो असतो'
ते म्हणाले की, तेव्हा मला या कटाबद्दल काहीच बोलायचे नव्हते. पण आता यावर चर्चा केली जाऊ शकते. मी यात खेळाडूंना सामील करणार नाही, पण पक्क सांगतो की, काही ग्रुप्स यात सामील होते.
रणातुंगानेही फायनल फिक्स असल्याचा आरोप केला आहे
तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि कॉमेंटेटर अर्जुन रणातुंगाने 2011 फायनलमध्ये श्रीलंकेच्या पराभवावर संशय व्यक्त केला होता. तो म्हणाला होता की, ‘‘जेव्हा आम्ही हरलो, तेव्हा मी खूप दुःखी होतो आणि मला संशय आला. 2011 मध्ये श्रीलंका का हारली, याची चौकशी व्हायला हवी. मी आतातर काही खुलासा करू शकत नाही, पण एकेदिवशी सगळ सांगेन.’’ रणातुंगा 2011 च्या फायनल मॅचमध्ये कॉमेंट्री करत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.