आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cristiano Ronaldo Wife Georgina Rodriguez; Saudi Arabia Rules | Cristiano Ronaldo

रोनाल्डो सौदीमध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार:रोनाल्डो-जॉर्जिनाच्या प्रेमाला काय शिक्षा? काय आहे सौदी अरेबियाचा कायदा

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस्तियानो रोनाल्डोने अलीकडेच अल नासेर फुटबॉल क्लबसोबत करार केला आहे. या करारामुळे रोनाल्डो त्याच्या अल नासेरच्या कार्यकाळासाठी कुटुंबासह सौदी अरेबियात पोहोचला. सौदी अरेबियामध्ये रोनाल्डो त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज आणि मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.

आपली जोडीदार जॉर्जिनासोबत राहून रोनाल्डो सौदी अरेबियात मोठा कायदा मोडत आहे. हा कायदा मोडल्याबद्दल रोनाल्डो आणि त्याच्या जोडीदाराला शिक्षा होईल का?

विशेष म्हणजे, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज हे दोघेही लिव्ह इन पार्टनरशीप मध्ये राहत आहेत. दोघांचेही लग्न झालेले नाही. सौदी कायद्यानुसार, अविवाहित जोडपे तेथे एकत्र राहू शकत नाहीत, परंतु रोनाल्डोची प्रतिमा पाहता रोनाल्डोला कायदा मोडल्याबद्दल शिक्षा होण्याची शक्यता नाही.

EFE या वृत्तसंस्थेशी बोलताना एका वकिलाने सांगितले की, या कायद्याचा सुपरस्टार फुटबॉलर रोनाल्डो आणि त्याच्या जोडीदारावर कोणताही परिणाम होणार नाही.

वकिलाच्या म्हणण्यानुसार, “आजही , राज्य कायदा अजूनही लग्नाशिवाय एकत्र राहण्यास मनाई करतो. मात्र आता अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक करण्यास सुरुवात केल्याने कोणावरही कारवाई होत नाही.

पंरतु, जेव्हा एखादी समस्या याच्याशी संबंधित किंवा गुन्हा असेल तेव्हा या कायद्यांचा वापर केला जातो. ते पुढे म्हणाले, "सौदी अरेबियाचे अधिकारी यापुढे परदेशी लोकांच्या अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत, परंतु कायद्याने विवाहाशिवाय सहवास करण्यास मनाई आहे."

रोनाल्डो रिअल माद्रिदमध्ये असताना 2016 मध्ये जॉर्जिना रॉड्रिग्जला भेटले आणि त्यांना दोन मुले आहेत – बेला आणि अलाना. रोनाल्डोला आणखी तीन मुले आहेत - क्रिस्टियानो जूनियर, इवा आणि माटेओ. ईवा आणि माटेओ हे जुळे आहेत.

अल नासेर फुटबॉल क्लबसोबत 2025 पर्यंत करार

37 वर्षीय रोनाल्डोचा क्लबसोबत 2025 पर्यंत करार आहे. रोनाल्डोने सोशल मीडियावर अल नासेरची जर्सी असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याचा आवडता क्रमांक 7 छापलेला आहे.

संघात सामील झाल्यानंतर त्याने सांगितले की, तो अल नासरमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. तो पुढे म्हणाला, मी भाग्यवान आहे की मी 'युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही करायचे ठरवले होते ते सर्व साध्य केले आहे. आता मला वाटते की आशियामध्ये माझा अनुभव शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे.

अल नासरने 9 वेळा सौदी अरेबिया प्रो लीगचे विजेतेपद जिंकले आहे. क्लबने शेवटचे हे विजेतेपद 2019 मध्ये जिंकले होते.

बातम्या आणखी आहेत...