आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबाॅलच्या विश्वातील सुपरस्टार क्रिस्टियानाे राेनाल्डाेसाठी आम्ही फिफा विश्वचषक हा अविस्मरणीय करणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठीच पाेतुर्गाल टीम या विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. पाेर्तुगाल टीमला अजूनही वर्ल्डकपमधील प्रवेशाची एक संधी आहे. त्यासाठीच आमचा राष्ट्रीय संघ आता प्रयत्नशील आहे, अशा शब्दात पाेर्तुगालच्या २६ वर्षीय फाॅरवॅर्ड आंद्रे सिल्वाने आगामी डावपेचाची माहिती ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
कतार येथे यंदा २१ नाेव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान फिफाची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा हाेणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप पाेर्तुगाल टीमला आपला प्रवेश निश्चित करता आला नाही. सिल्वा हा सध्या जर्मन फुटबाॅल लीग बुंदेसलिगामध्ये आरबी लिपजिग क्लबकडून खेळत आहे. त्याच्या नावे या क्लबकडून आठ गाेलची नाेंद झाली आहे.
बुंदेसलिगामध्ये सर्वाेत्तम गाेलरक्षक काेण?, काेणाविरुद्ध गाेल करणे आव्हानात्मक ?
बुंदेसलिगामध्ये गुलाक्सी हा सर्वाेत्तम गाेलरक्षक आहे. मी फ्रँकफर्ट क्लबमध्ये असताना त्याच्या विरुद्ध शेवटपर्यंत मला गाेल करता आला नाही. याशिवाय मेन्युअल नेऊरही सर्वाेत्तम गाेलरक्षकापैकी एक आहे. त्याच्यामुळे मला म्युनिचविरुद्ध गाेल करता आला नाही.
सध्या आरबी लिपजिंग क्लबची सत्रातील कामगिरी निराशाजनक?
हाे. आम्हाला काही सामन्यात सुमार खेळीचा फटका बसला आहे. मात्र, आता कामगिरीचा दर्जा उंचावत टाॅप-३ मध्ये येण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे अद्यापही बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आम्हाला हे निश्चित केलेले लक्ष्य गाठता येईल. त्यासाठी लिपजिंग क्लबचे खेळाडू सज्ज झाले आहेत.
पाेर्तुगाल टीम विश्वचषकासाठी पात्र ठरेल का?
पाेर्तुगाल टीम कतारमधील विश्वचषकामधील आपला प्रवेश निश्चित करू शकेल. यासाठी टीमकडे अजूनही संधी आहेत. सध्या आमचा संघ पात्रता फेरीच्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. अजून आम्हाला दाेन पात्रता फेरी खेळाव्या लागणार आहेत. त्यामुळे आम्ही स्पर्धेतील पात्रतेचे लक्ष्य सहज गाठू शकताे. यासाठी प्रत्येक जण प्रचंड मेहनत घेत आहे.
यंदाचा विश्वचषक हा राेनाल्डाेचा शेवटचा का? त्यासाठी वेगळा प्लॅन?
राेनाल्डाे हा करिअरमधील आपला शेवटचा वर्ल्डकप खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आम्ही त्याच्यासाठी हा विश्वचषक अविस्मरणीय करण्याच्या तयारीत आहाेत. यासाठी प्रत्येक जण कसून मेहनत घेत आहे. त्यामुळे राेनाल्डाेला हा विश्वचषक आयुष्यभर आठवणीत राहील. मी त्याचा बालपणापासूनच फॅन आहे. त्यामुळे माझ्या आवडत्या खेळाडूसाठी मी विशेष कामगिरी करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.