आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेशन्स फुटबॉल लीग:क्रोएशियाने गत चॅम्पियन फ्रान्सला बरोबरीत रोखले, रंगतदार सामना 1-1  ने बरोबरीत

जाग्रेब23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंद्रेज क्रामारिचने सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला शानदार गोल करून यजमान क्रोएशियाच्या घरच्या मैदानावरील लाजिरवाणा पराभव टाळला. याच गोलच्या बळावर क्रोएशियाने नेशन्स फुटबॉल लीगमध्ये गत चॅम्पियन फ्रान्स संघाला बरोबरीत रोखले. त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ संघांतील हा सामना १-१ ने बरोबरीत राहिला. फ्रान्स संघाकडून आद्रियनने (५२ वा मि.) एकमेव गोल केला.

या दोन्ही संघांचा लीगमधील हा दुसरा सामना आहे. क्रोएशिया आणि फ्रान्सला आपापल्या सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर दुसरा सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. डेन्मार्क संघाने आपली लय कायम ठेवताना लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. डेन्मार्कने लीगच्या दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रियाचा पराभव केला. डेन्मार्कने २-१ ने रोमहर्षक विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...