आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत उपविजेता क्रोएशियाने अतिरिक्त वेळेत आपल्या खेळाचा दर्जा उंचावत ब्राझीलला विश्वचषकातून बाहेर केले. क्रोएशियाने ५ वेळच्या जागतिक विजेत्या ब्राझीलला पेनल्टी शूटआऊटवर ४-२ ने हरवले. क्रोएशियाचा संघ केवळ सहाव्यांदा विश्वचषक खेळत आहे व आता तो तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला. दुसरीकडे, ब्राझीलचा हा २२ वा विश्वचषक आहे. संघ गत पाच विश्वचषकात चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर झाला आणि त्यांचे २००२ नंतर विश्वचषक चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले. क्रोएशियाने पुन्हा एकदा पेनल्टीमध्ये शूट केले. विश्वचषकात क्रोएशिय चौथ्यांदा पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि त्यांनी प्रत्येक वेळी विजय मिळवला. क्रोएशियाचा विश्वचषकात शूटआऊटमध्ये १०० टक्के विजयाचा विक्रम कायम आहे. संघाने यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा शूटआऊटमध्ये सामना जिंकला. एज्युकेशन सिटी स्टेडियमवर निर्धारित वेळेत दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. त्यानंतर अतिरिक्त वेळेत पहिला गोल नेमारने केला. त्याने १०५+१ मिनिटाला ब्राझीलला आघाडीवर नेले. त्यानंतर क्रोएशियाच्या ब्रुनो पेट्कोविचने ११६ व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. निकालाच्या पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने बाजी मारली.
क्रोएशियाच्या डोमिनिचचे दोन बचाव क्रोएशिया शूटआऊट 1. निकोला व्लासिच - गोल मध्ये रुपांतर 2. लाेवरो माएर- गोल मध्ये रुपांतर 3. लुका मोड्रिच- गोल मध्ये रुपांतर 4. मिसलाव ओरसिच- गोल मध्ये रुपांतर ब्राझील शूटआऊट 1. रॉड्रिगो - गोल करु शकले नाही 2. केसमिरो - गोल मध्ये रुपांतर 3. पेड्रो - गोल मध्ये रुपांतर 4. मारक्विनहोस- गोल करु शकले नाही
77 गोल झाले नेमारचे ब्राझीलकडून. ब्राझीलच्या सर्वाधिक गोल करण्याच्या सर्वकालीन विक्रमात पेलेची बरोबरी केली. 13 वा संघ आहे ब्राझील, जो १-० ने आघाडीसह अतिरिक्त वेळेत गेला. पण आघाडीनंतरही बाहेर होणारा पहिला संघ.
दिव्य मराठी विश्लेषण फिफा विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ब्राझीलची सुरुवात चांगली झाली. संपूर्ण सामन्यात संघाने एकूण १७ आक्रमणे केली, परंतु क्रोएशियन गोलरक्षकाने चमकदार कामगिरी करत पाच महत्त्वपूर्ण गोल वाचवून संघाला विजयाच्या जवळ नेले. ब्राझीलच्या खेळाडूंना प्रथमच वॉलपोस्टमध्ये गोल करता आला नाही, परंतु अतिरिक्त वेळेच्या पहिल्या हाफमध्ये नेमारने २० यार्ड््सवरून लांब शॉट मारला. त्याने २ खेळाडूंव्यतिरिक्त गोलरक्षकाकडून चेंडू वाचवत गोल केला, जो या विश्वचषकातील सर्वोत्तम गोल आहे. त्यानंतर उत्तरार्धात ब्राझीलने बचावात्मक न खेळता आक्रमक खेळायला हवे होते. याचा फायदा नक्कीच झाला असता. क्रोएशियाची सुरुवात चांगली झाली नाही. एरियल बॉलमध्ये मास्टर असलेल्या क्रोएशियनला ब्राझीलविरुद्ध फायदा झाला नाही. मेसीसह अनेक मोठ्या खेळाडूंचे पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल हुकले.
ब्राझीलविरुद्ध डोमिनिचची कामगिरी {11 बचाव {7 बॉक्समध्ये केले बचाव {51 टच {26 अॅक्युरेट पास
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.