आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्वाडियाेल (७ वा मि.) आणि आेर्सिकने (४२ वा मि.) सर्वाेत्तम खेळीतून गत उपविजेत्या क्राेएशिया संघाला यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेमध्ये तिसऱ्या स्थानाचा बहुमान मिळवून दिला. क्राेएशिया संघाने तिसऱ्या स्थानाच्या लढतीमध्ये शनिवारी माेराेक्काेचा पराभव केला. क्राेएशिया संघाने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. माेराेक्काे संघाकडून डारीने (९ वा मि.) एकमेव गाेल केला. इतर फुटबाॅलपटूंच्या सुमार खेळीने टीमला चाैथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, टीमने करिअरमध्ये पहिल्यांदाच फिफा विश्वचषकामध्ये चाैथे स्थान गाठले आहे.
यासह तिसरे स्थान गाठणाऱ्या क्राेएशिया संघाला २२३ काेटींचे बक्षिस देऊन गाैरवण्यात आले. तसेच आफ्रिकन फुटबाॅल संघ माेेराेक्काे २०७ काेटींचा मानकरी ठरला आहे. माेराेक्काे संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली हाेती. मात्र, याठिकाणी संघाचा पराभव झाला. त्यामुळे टीमला तिसऱ्या स्थानासाठी झंुज द्यावी लागली.
गत उपविजेत्या क्राेएशिया संघाने दमदार सुरुवात करताना आपला दबदबा निर्माण केला. टीमने सामन्यादरम्यान ५० टक्के बाॅलवरील आपले पझेशन कायम ठेवले. तसेच यादरम्यान गाेलसाठी टीमच्या खेळाडूंनी जवळपास ४८८ पासेस केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.