आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • CSK Coronavirus IPL UAE 2020 Update | MS Dhoni Team Player Chennai Super Kings (CSK) Suresh Raina Returns Delhi From UAE For Family Reasons

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:सुरेश रैना भारतात परतला, आयपीएलचा हा सीजन खेळणार नाही; वैयक्तिक कारणामुळे यूएईतून परतल्याचे चेन्नई सुपर किंग्सचे स्पष्टीकरण

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्ट रोजी धोनी आणि रैनाने केली होती निवृत्ती घेत असल्याची घोषणा

आयपीएल 2020 च्या तयारीला लागलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. टीमचा स्टार क्रिकेटर आणि बॅट्समन सुरेश रैना यूएई दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सुरेश रैना यंदाचा आयपीएल सीजन खेळणारन नाही. तरीही रैनाने हा निर्णय वैयक्तिक कारणांवरून घेतला असल्याचा दावा त्याच्या टीमकडून केला जात आहे. परंतु, स्वतः रैनाने यासंदर्भात काहीच बोललेले नाही. रैना कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली असेही वृत्त आहे. पण, यासंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा नाही.

रैनाचा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे -सीएसके

चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ केएस विश्वनाथन यांनी टीमच्या ट्विटर हँडलवरून रैनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रैनाने आपल्या वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला असा दावा त्यांनी केला. सोबतच, तो या सीजनमध्ये खेळणार नाही असेही सीएसकेने स्पष्ट केले आहे. सीएसके सध्या सुरेश रैना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे.

15 ऑगस्ट रोजी घेतली निवृत्ती

महेंद्र सिंह धोनीसह 33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनी आणि रैना या दोघांनाही पत्र लिहून त्यांचे क्रिकेटला दिलेल्या योगदानाचे कौतुक केले होते. रैनाने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ससाठी 193 सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने 137 च्या स्ट्राइक रेटसह जवळपास 5 हजार धावा काढल्या. सोबतच, 25 बळी सुद्धा घेतले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser