आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए) संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या सुरुवातीला सलग सामने जिंकत होते, मात्र आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी सतत होणारा पराभव टाळण्यासाठी चेन्नईने पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या हाती कमान सोपवली आहे. अशा स्थितीत आज रंजक टक्कर अपेक्षित आहे.
बंगळुरुच्या प्रत्येक खेळाडूला योगदान देण्याची गरज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा न करणे ही मोठी समस्या आहे. विराट निश्चितपणे 100 मध्ये परतला, परंतु त्याचे अर्धशतक टी-20 साठी खूपच संथ होते. कर्णधार फाफच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असून त्याने चांगली खेळी खेळणे अपेक्षित आहे. शेवटी आलेला दिनेश कार्तिक सुद्धा आता मॅच विनिंग खेळी खेळताना दिसत नाही.
बंगळुरु सोबत चांगले खेळाडू नक्कीच आहेत, पण मैदानावर केवळ नाव नाही, तर त्याचे कामच बोलते. 1-2 अशा पराभवानंतर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडू शकतो. अशा परिस्थितीत, बेंगळुरूने एक युनिट म्हणून मैदानात उतरले पाहिजे जिथे प्रत्येक खेळाडूला संघाप्रतीची आपली जबाबदारी समजेल.
कर्णधार बदलल्याने नशीब बदलेल?
चेन्नईने कर्णधार बदलानंतर पुन्हा लढण्याचे धाडस दाखवले आहे. सनरायझर्ससारख्या भक्कम गोलंदाजीचा सामना करताना त्यांच्या टॉप ऑर्डरने ज्याप्रकारे निर्भयपणे फलंदाजी केली, त्यामुळे सीएसके प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. आज CSK ला त्यांच्या सलामी फलंदाजाकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल
दीपक चहरच्या जागी संघात सामील झालेला गोलंदाज मुकेश चौधरी अखेर लयीत आला असून त्याने अखेरच्या सामन्यात 4 बळी घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. महेश तिक्षणा सोबत, तो पुन्हा एकदा सामना जिंकून देण्याचे काम करू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.