आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSK vs SRH:सनरायजर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्सचा 7 धावांनी पराभव, चेन्नईचा सलग तिसरा पराभव

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबाती रायडू परतला, ब्रावोचा सीजनमधला पहिला मॅच

आयपीएलच्या 13व्या सीजनचा 14वा मॅच आज चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) दरम्यान दुबईमध्ये सुरू जात आहे. हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला हैदराबादने 165 रनांचे टार्गेट दिले होते. चेन्नई फक्त 157 धावा काढू शकले. हैदराबादकडून सर्वात जास्त रन प्रियम गर्ग (51) आणि अभिषेक शर्मा (31) ने काढले. तर, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलमध्ये सर्वात जास्त 194 सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दोन्ही संघ

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि टी नटराजन.

चेन्नई: शेन वॉटसन, अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, सैम करन, शार्दुल ठाकुर, पीयूष चावला आणि दीपक चाहर.

दोन्ही संघातील महाग खेळाडू

सीएसकेचा कर्णधार धोनी सर्वात महाग खेळाडू आहे. संघाने धोनीला 15 कोटी रुपयात विकत घेतले आहे. त्यानंतर केदार जाधव 7.80 कोटी. तर, हैदराबादमध्ये सर्वात महाग खेळाडू डेविड वॉर्नर आहे. त्याला संघाने 12.50 कोटी रुपयात घेतले आहे. यानंतर मनीष पांडेला 11 कोटी रुपये मोजले आहेत.

सीजनमध्ये या मैदानात कोणतीच टीम चेज करू शकली नाही

दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात गोलंदाजांची भूमिका महत्वाची असेल. या सीजनमध्ये या मैदानात आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. यात चेज करणाऱ्या संघाचा नेहमी पराभव झाला आहे. दिल्ली-पंजाब आणि बंगळुरू-मुंबईचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये झाला होता, पण प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला होता.

चेन्नईने 3 आणि हैदराबादने 2 वेळा किताब जिंकला

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने सलग दोन वेळेस 2010 आणि 2011 मध्ये आयपीएल किताब जिंकला आहे. तर, त्यानंतर 2018 मध्ये किताब जिंकला होता. तर हैदराबादने 2 वेळेस (2009 आणि 2016) आयपीएल किताब जिंकला आहे.

बातम्या आणखी आहेत...