आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेला ऋतुराज गायकवाड आपल्या तुफानी खेळी आणि कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाला विजय हजारे ट्राॅफी जिंकून देण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी महाराष्ट्र संघ शुक्रवारी मैदानावर उतरणार आहे. नरेंद्र माेदी स्टेडियमवर आज महाराष्ट्र आणि साैराष्ट्र यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. सध्या महाराष्ट्र संघाचे फलंदाज आणि गाेलंदाज फाॅर्मात आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र संघाचा फायनलमधील विजयाचा दावा मजबूत मानला जात आहे. ऋतुराजच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गत उपांत्य सामन्यात आसामला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने १२ धावांनी सामना जिंकला. या सामन्यामध्ये कर्णधार ऋतुराज आणि अंकित बावणेने द्विशतकी भागीदारी केली. तसेच गाेलंदाजीत राजवर्धन हंगरगेकर चमकला. त्याने चार बळी घेतले.
{उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतील सर्वात कठीण डाव कोणता होता? उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक केल्यानंतर मी उपांत्य फेरीतही शतक झळकावू शकेन असे वाटले नव्हते. मी उपांत्यपूर्व फेरीतील द्विशतक अधिक महत्त्वाचे आणि कठीण मानेन. कारण त्या वेळी परिस्थिती अधिक आव्हानात्मक होती. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या. मात्र, आम्ही यात बाजी मारली. यामुळे आगेकूच करता आली.
{एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारताना कसे वाटले? कशी हाेते डावपेच? शेवटच्या षटकात तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागेल आणि मीही तेच करत होतो. प्रत्येक चेंडूवर षटकाराचा विचार करत नाही, पण पाचवा चेंडू नो बॉल होता. त्याला षटकार मारल्यानंतर मला वाटले की आता फ्री हिटवर षटकार मारण्याचा विक्रम करेन.
{संघाचे नेतृत्व करण्याचा विचार केला आहे का? आयपीएल संघाचे कर्णधार बनणे खूप दूरची गोष्ट आहे. हे खरे आहे की चेन्नई आणि इतर संघ आयपीएलमध्ये कर्णधाराच्या शोधात आहेत, पण सध्या माझ्यासाठी कर्णधारपद हा फार मोठा मुद्दा नाही. सध्या मी फक्त माझ्या खेळावर आणि महाराष्ट्राच्या कर्णधारपदावर लक्ष्य केंद्रित करत आहे.
{कर्णधार म्हणून रणनीती काय होती? संघातील खेळाडू सीझनमध्ये एकमेकांसोबत कमी वेळ घालवू शकतात म्हणून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आठदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संघाला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सराव केला. याचाच परिणाम म्हणजे आमचा संघ प्रथमच फायनलमध्ये पोहोचला आहे. आता महाराष्ट्राला कोणी कमी लेखणार नाही. यामुळे संघ मजबुत ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.