आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Dane Sports Fans React To The Ban On Entry To The Stadium; Looking Forward To Favorite Players

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी खास:परवानगी नाही मिळाली तर सचिनकडून मागणार मदत : सुपर फॅन सुधीर; हाेमग्राउंडवरच्या चाहत्यांचे पाठबळ खेळाडू गमावतील : वन टीम वन ड्रीम

रायपूर/चंदिगड (शेखर झा/गौरव मारवाह)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाेन खेळांच्या फॅन्सची स्टेडियममधील प्रवेशबंदीवर प्रतिक्रिया; आवडत्या खेळाडूंसाठी असतात उत्सुक

देशामध्ये अनलॉक-१ नंतर आता धाेका काहीसा आटाेक्यात आला. त्यामुळे खेळाडू हे मैदानावर परतत आहेत. काही खेळाडू आणि संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप इव्हेंटच्या आयाेजनाबाबत काेणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. हे इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांनाही प्रवेश मिळावा, अशीच मागणी केली जात आहे. याबाबत सुपर फॅन्स म्हणून आेळखल्या जाणाऱ्या सुधीरकुमार आणि वन टीम वन ड्रीमने आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सामन्यादरम्यान खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याची सुधीरची इच्छा

सचिनतेंडुलकरचा सुपर फॅन म्हणून आेळखला जाणारा सुधीरकुमार सध्या बिहार येथील दामाेदरपूर येथे आपल्या घरीच आहे. त्यालाही या लाॅकडाऊनदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, यावर मात करत त्याने आपले घर गाठले. ताे दीड महिना दिल्लीमध्ये अडकलेला हाेता.

‘क्रिकेटचे सामने लवकरच सुरू हाेण्याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट हाेत आहे. त्यासाठीच्या सरावाला सुरुवात झाली. मात्र, प्रेक्षकांना यादरम्यान स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा माझ्यासारख्या सुपर फॅनला माेठ्या अडचणीला सामाेरे जावे लागेल. यासाठी परवानगी मिळाली नाही तर मी क्रिकेटचा देव सचिनकडून मदत मागणार आहे. कारण मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी मला स्टेडियममध्ये जायचे आहे, असे सुधीर म्हणाला. त्याने आतापर्यंत ६०० सामन्यांत तिरंगा फडकवला. यात ३७२ वनडे, ७२ कसाेटी, ७४ टी-२०, ७९ आयपीएल, ३ रणजी सामन्यांचा समावेश आहे.

स्टेडियममध्ये बसल्यावर सामन्याच्या थराराचा आनंद हा आता थेट प्रक्षेपणातून मिळवता येणार नाही

हाॅकी चाहत्यांचा एक असा ग्रुप आहे, ज्याची जगाच्या कानाकाेपऱ्यात कुठेही सामना खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय हाॅकी संघासाेबत जात असताे. वन टीम वन ड्रीम नावाने आेळखला जाणारा हा ग्रुप सातत्याने विदेश दाैऱ्यावर असलेल्या भारतीय हाॅकीपटूंचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी प्रयत्नशील असताे. यातूनच या टीमचा स्टेडियममधील सहभाग हा सर्वांसाठीच लक्षवेधी ठरणारा असताे. मात्र, आता प्रेक्षकांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयाचा या टीमलाही माेठा धक्का बसणार आहे. हाॅकी हाच या ग्रुपमधील सर्वांच्या आयुष्याचा भाग ठरलेला आहे. त्यामुळे हा ग्रुप चर्चेत असताे.

‘स्टेडियममधील प्रेक्षकांच्या बंदीने माेठा धक्का सर्वांनाच बसणारा ठरेल. यातून हाॅकी इंडियाच्या वतीने थेट प्रक्षेपणाची तयारी केली जाऊ शकेल. मात्र, यामध्ये काेणत्याही प्रकारचे समाधान मिळणार नाही. स्टेडियममध्ये बसून मैदानावरच्या सामन्यातील थरारक अनुभव हा लाइव्हमधून मिळणार नाही. त्यामुळे सर्वच प्रेक्षक या आनंदाला मुकतील, अशीही या टीमच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...