आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Daniel Medvedev Defeated 20 time Champion Novak Djokovic; News And Live Updates

यूएस ओपन:16 वर्षांनी नवा चॅम्पियन; डॅनिल मेदवेदेवनेने 20 वेळेच्या चॅम्पियन नोवाक योकोविकला हरवले

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाच ग्रँडस्लॅममध्ये २ गटांतील किताब नव्या खेळाडूंनी जिंकला

नोवाक योकोविकने म्हटले होते की, सामना असा खेळेल की, हा त्याचा अखेरचा सामना आहे. त्याने या सामन्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते, मात्र तरीदेखील अपयशी ठरला. शक्ती आणि सर्जनशीलतेच्या शानदार कामगिरीसह डॅनिल मेदवेदेवने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा ६-४, ६-४, ६-४ ने पराभव केला. रशियाच्या मेदवेदेवने सर्बियाच्या योकोविकचे ५२ वर्षांनंतर कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनण्याचे स्वप्न भंग केले. रविवारची रात्र योकोविकसाठी महत्त्वाची होती.

तो रॉजर फेडरर व राफेल नदालसह सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. त्याच्याकडे या दोघांना मागे सोडत महान खेळाडू बनण्याची संधी होती. २५ वर्षीय मेदवेदेवने ३४ वर्षीय योकोविकला सलग सेटमध्ये हरवले. मेदवेदेवने करिअरमध्ये प्रथमच ग्रँडस्लॅम किताब जिंकला. मेदवेदेव चौथा खेळाडू बनला, ज्याने योकोविकला महत्त्वाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग सेटमध्ये नमवले. यापूर्वी, फेडरर, अँडी मरे व नदालने अशी कामगिरी केली होती.

मेदवेदेवने २०१८ मध्ये १२ सप्टेंबर रोजी मैत्रिण डारियाशी लग्न केले होते. रविवारी लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी त्याने पत्नीला हा किताब जिंकून भेट दिली. त्याने म्हटले की,‘मी केवळ एकच विचार करत हाेतो, पराभव झाल्यास भेटवस्तू खरेदी करण्यास वेळ नसेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सामना जिंकू इच्छित होतो.’

एल्कॉट व डी ग्रुटने पूर्ण केला गोल्डनस्लॅम
ऑस्ट्रेलियाचा व्हीलचेअर टेनिसपटू डायलन एल्कॉट फायनलमध्ये हाॅलंडच्या नील्स विंकला ७-५, ६-२ ने हरवले. दुसरीकडे, हॉलंडच्या डिएडे डी ग्रुटने महिला व्हीलचेअर फायनलमध्ये जपानच्या युई कामिजिला ६-३, ६-२ ने हरवले. या दोघांनी वर्षातील ४ ग्रँडस्लॅम व पॅरालिम्पिकचे सुवर्णपदक जिंकून गोल्डनस्लॅम पूर्ण केला.

२००४ नंतर महिला-पुरुष गटात नवा विजेता
एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये २००४ नंतर प्रथमच महिला व पुरुष गटात नवे चॅम्पियन मिळाले. शनिवारी रात्री यूएस ओपनच्या महिला एकेरीचा किताब इंग्लंडच्या एमा राडुकानूने जिंकला. २००४ फ्रेंच ओपनमध्ये अर्जेंटिनाच्या गेस्तोन गाडियोने पुरुष व रशियाच्या अनास्तासियाने महिलांचा किताब मिळवला होता.

मेदवेदेव २१ वर्षांनी यूएस ओपन चॅम्पियन बनणारा पहिला रशियन खेळाडू
मेदवेदेव २१ वर्षांनी हा ग्रँडस्लॅम जिंकणारा रशियाचा पहिला खेळाडू बनला. वर्ष २००२ मध्ये मरात साफिनने हा किताब जिंकला होता. मेदवेदेव ग्रँडस्लॅम जिंकणारा रशियाचा तिसरा खेळाडू आहे. हा रशियाचा एकूण पाचवा ग्रँडस्लॅम किताब ठरला. साफिन आणि येवजेनी काफेलनिकोवने यापूर्वी ग्रँडस्लॅम किताबावर आपले नाव कोरले आहे.

बातम्या आणखी आहेत...