आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सीजनचा 11वा मॅच दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनराइजर्स हैदराबाद (SRH)दरम्यान अबु धाबीमध्ये झाला. यात हैदराबादने दणदणीत विजय मिळवला आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताल. हैदराबादने दिल्लीला 163 रनांचे टार्गेट दिले होते. दिल्ली कॅपिटल्स 20 ओव्हरमध्ये फक्त 147 धावांची मजल मारू शकले. हैदराबादकडून राशीद खानने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
दरम्यान, दिल्लीची या सीजनमध्ये विजयाची हॅट्रीक मारण्याची संधी हुकली. यापूर्वी 2009 मध्ये दिल्लीने आपले पहिले 3 मॅच जिंकले होते, तेव्हा संघ सेमीफायनलपर्यंत गेला होता. तर, सनराइजर्स हैदराबादने पहिले दोन सामना हरल्यानंतर आज सामना जिंकला.
दोन्ही संघ
दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शिमरोन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, ईशांत शर्मा आणि एनरिच नोर्त्जे.
हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि टी नटराजन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.